Goa Liquor Seizure | बांदा येथे साडेचार लाखांची गोवा दारू जप्त; एकास अटक

Goa Liquor Seizure |
जप्त करण्यात आलेल्या मुद्दमालासह बांदा पोलिस अधिकारी व कर्मचारी.
Published on
Updated on

बांदा : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोवा राज्यातून होणाऱ्या अवैध मद्यवाहतुकीविरोधात बांदा पोलिसांनी पुन्हा प्रभावी कारवाई केली आहे. गुरुवारी दुपारी सुमारे २.१५ वा.च्या सुमारास बांदा चेकपोस्ट येथे नियमित नाकाबंदी सुरू असताना पोलिसांनी एका बोलेरो पिकअपची तपासणी केली. या वाहनातून गोवा बनावटीच्या विविध ब्रँडच्या विदेशी मद्याचा साठा आढळून आला. या कारवाईत एकूण ९ लाख ४७ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अमोल लक्ष्मण चिंदरकर (३५, रा. कलमठ, ता. कणकवली) याला अटक करण्यात आली आहे.

वाहनात गोवा बनावटीच्या विविध ब्रँडच्या विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. त्यामध्ये ४ लाख ४७ हजार २४० रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ५ लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअपही जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण ९ लाख ४७ हजार २४० रु.चा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. याप्रकरणी बांदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर व अति. पोलिस अधीक्षक नवमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक पंकज शिंदे, पोलिस उपनिरीक्षक पालकर, पोलिस उपनिरीक्षक पवार तसेच पोलिस हेडकॉन्स्टेबल श्री. परब यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news