Sindhudurg : आयुर्वेद, निसर्गाशी नाते सांगणारी घटस्थापना!

घटस्थापनेलाआयुर्वेदिक दृष्ट्या महत्त्व
Sindhudurg News
आयुर्वेद, निसर्गाशी नाते सांगणारी घटस्थापना!
Published on
Updated on

सगुण मातोंडकर

मळगाव : हिंदू धर्मात घटस्थापनेत फक्त धार्मिकता नसून शारीरिक आणि आयुर्वेदिक महत्त्वही आहे. जीवन, ऊर्जा, प्रगती, आरोग्य, शुद्धता आणि समृद्धी यांचे घटस्थापना हे सामूहिक प्रतीक आहे. निसर्गाशी संतुलित राहूनच जीवन समृद्ध होते.

घटस्थापनेचे शारीरिकद़ृष्ट्या महत्त्व आहे. घटामध्ये ठेवलेले पाणी, हळद, सुपारी, आंब्याची पाने, नारळ - हे सर्व प्रतिजैविक (अपींळाळलीेलळरश्र) आहेत. त्यामुळे घरातील हवा व वातावरण शुद्ध राहते. नवरात्री पावसाळा संपून हिवाळ्याच्या सुरुवातीला येते. या काळात रोगप्रतिकारशक्ती कमी होते. घटाजवळ पेरलेली ज्वारी, गहू ऑक्सिजन व जीवनशक्ती देतात. ज्यामुळे शरीराचा ताजेपणा टिकतो. घटाजवळ बसून मंत्रजप, दीपज्योत, शांतीमंत्र यामुळे मन स्थिर होते, तणाव-चिंता कमी होते, झोप सुधारते.

आयुर्वेदात हळद व सुपारी रक्तशुद्धी, जंतुनाशक व पचनशक्ती वाढवणारे मानले गेले आहेत. ज्वारी, गहू यांचे अंकुर जीवनशक्ती (प्राण) वाढवतात. आयुर्वेदानुसार अंकुरलेले धान्य सात्त्विक, पचायला हलके व पोषक असते. नवरात्री ही ऋतुसंधी (पावसाळ्यातून हिवाळ्यात जाण्याचा काळ) आहे. यावेळी उपवास करून, हलके सात्त्विक आहार घेणे - शरीराच्या दोषांना (वात, पित्त, कफ) संतुलित ठेवते. घटस्थापना ही धार्मिक क्रिया नसून शरीर, मन, पर्यावरण यांचे शुद्धीकरण करणारी व पंचमहाभूतांचे संतुलन राखणारी आरोग्यवर्धक पद्धत आहे. घटस्थापनेतील वस्तू व त्यांचे फायदेही आहेत.

आयुर्वेदात नारळ शीतल (थंडावा देणारा), पित्तशामक, व ऊर्जादायी आहे. शरीराला नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स मिळतात (उन्हाळा/ऋतुबदलात उपयोगी). पचन सुधारते, उष्णतेमुळे होणार्‍या त्रासापासून संरक्षण होते. आंब्याच्या पानांना प्रतिजैविक (रपींळाळलीेलळरश्र) गुणधर्म आहेत. श्वसनसंस्थेला बल देतात, हवा शुद्ध करतात. आयुर्वेदात पानांचा उपयोग डायबिटीज नियंत्रणासाठी व मूत्रसंस्थेच्या विकारांमध्ये होतो. सुपारी ही कषाय (रीीींळपसशपीं) व उत्तेजक आहे. लाळेचे स्रवण वाढवते, पचन सुधारते. आयुर्वेदानुसार दात मजबूत करणे व तोंडातील जंतू कमी करणे यासाठी उपयुक्त. हळद हे उत्तम प्रतिजैविक, रक्तशुद्धीकारक व दाहशामक आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवते, त्वचेचे विकार दूर ठेवते. शरीरातील सूज, संधिवात, कफ यामध्ये उपयोगी.

अंकुरलेले गहू, ज्वारी, मका धान्य सात्त्विक, पचायला हलके व पौष्टिक. शरीरात प्राणशक्ती (श्रळषश शपशीसू) वाढवतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात व स्नायूंना बल देतात. (घटातील) पाणी हे जीवनाचे मूळ तत्त्व आहे. आयुर्वेदात पाणी म्हणजे त्रिदोषशामक (वात, पित्त, कफ संतुलित करणारे). घटामधील पाणी काही दिवस ठेवल्यावर ऊर्जायुक्त व पवित्र मानले जाते. तुपाच्या दिव्याचा धूर घरातील हवेत जंतुनाशक प्रभाव निर्माण करतो. मेंदूत सकारात्मक कंपन वाढवतो, मन प्रसन्न करतो. आयुर्वेदानुसार दिव्याचा धूर नाक-घसा स्वच्छ ठेवतो व श्वसनास मदत करतो. त्यामुळे हिंदू धर्मात घटस्थापनेला अन्योन्य साधारण महत्त्व आहे.

घटस्थापनेचे आयुर्वेदिक महत्त्व

घटस्थापनेलाआयुर्वेदिक दृष्ट्या महत्त्व आहे. घट म्हणजे पाणी तत्त्व, त्यावर नारळ म्हणजे आकाश व अग्नी तत्त्व, पाने म्हणजे वायू तत्त्व, आणि धान्य म्हणजे पृथ्वी तत्त्व आहे. आयुर्वेद सांगितले आहे की, हे पंचमहाभूत शरीरात संतुलित राहिले तर आरोग्य चांगले राहते. घटपूजेतील धूप, दिवा, सुगंधी फुले व धान्य हे सत्त्वगुण वाढवतात. ज्यामुळे मन शांत, शरीर हलके व रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते. नारळ, सुपारी, हळद यांचे औषधी गुणधर्म शरीरात उर्जा वाढवतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news