Sindhudurg ZP Election : आंबोली गटातील निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता!

गटात शिवसेना व भाजपाचेच उमेदवार; विरोधकांचा उमेदवारच नाही
Zilla Parishad Elections
Sindhudurg ZP Election(Pudhari File Photo)
Published on
Updated on

आंबोली : निर्णय राऊत

जिल्हा परिषद आंबोली गटातून उबाठा शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादीसह काँग्रेसने आपला अधिकृत उमेदवार दिलेला नाही. तर दुसरीकडे भाजपा -शिंदे शिवसेना युतीत हा मतदारसंघ शिंदे शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. मात्र भाजपाने ही आपले उमेदवार येथे दिला आहे. यामुळे प्रथम दर्शनी युतीत फूट पडल्याचे चित्र आहे. परंतु, येत्या 1 ते 2 दिवसात भाजपा-शिंदे शिवसेना यांच्यातील युतीबाबत वरिष्ठ पातळीवर बैठक झाल्यावर युतीचा अधिकृत उमेदवार फायनल होण्याची शक्यता आहे. त्यामुळ भाजप किंवा शिंदे शिवसेनेचा उमेदवार आपली उमेदवारी माघार घेईल! अनफॅ तसे झाल्यास आंबोली गटाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

आंबोली जिल्हा परिषद गटावर आ. दीपक केसरकर यांचेच नेहमी वर्चस्व राहिले आहे. याच मतदारसंघातून भाजपा, शिंदे शिवसेना, उबाठा शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी पक्ष व काँग्रेस पक्षातून अनेक उमेदवार हे इच्छुक होते. यासाठी काहींनी गेल्या दोन ते तीन वर्षापासून जय्यत तयारी केली होती. दरम्यान भाजपा व शिंदे शिवसेना यांच्यात युती झाल्याने शिंदे शिवसेनेला आंबोली जि.प. गट सोडण्यात आला. त्यामुळे युतीचा अधिकृत उमेदवार म्हणून शिंदे शिवसेनेकडून सावंतवाडी तालुकाध्यक्ष दिनेश गावडे यांच्या पत्नी सुप्रिया गावडे यांनी जिल्हा परिषद गटासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सोबत पं. स.साठी मायकल डिसोजा (आंबोली), दिनानाथ कशाळीकर (विलवडे) यांचेही अर्ज दाखल करण्यात आले.

Zilla Parishad Elections
Raigad News : कोकण किनारपट्टीला पर्यटकांची प्रथम पसंती!

याच दरम्यान अचानक भाजपाकडूनही जि.प.साठी चौकुळमधील शोभा गावडे व पं.स.साठी शशिकांत गावडे (आंबोली), प्रशांत सुकी (विलवडे) यांचे अर्ज पक्षाच्या अधिकृत एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केला. दुसरीकडे उबाठा शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादीसह काँग्रेसने जि.प व पं.स. करिता त्यांच्याकडे सक्षम इच्छुक उमेदवार असतानाही नामांकनाच्या अंतिम 21 तारखेपर्यंत (विलवडे वगळता) इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म दिले नाही. विशेषतः उबाठा शिवसेनेकडून अधिकृत उमेदवार दिला जाणार होता त्यासाठी तशी तयारी देखील झालेली होती. मात्र, उबाठा शिवसेनाकडून फक्त पंचायत समिती आंबोलीकरीता विभाग प्रमुख बबन गावडे यांचा एकच उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे सद्या आंबोली जिल्हा परिषद मतदार संघात भाजप व शिंदे शिवसेना यांचेच उमेदवार रिंगणात आहेत.

यात पंचायत समितीसाठी 3 अपक्ष (आंबोली गण-3 तर विलवडे गण-1) व एक काँग्रेस असे अर्ज दाखल आहेत. यातील युतीचेच काही डमी अपक्ष उमेदवार आहेत. येत्या 1 ते 2 दिवसात भाजपा-शिंदे शिवसेना युतीच्या वरिष्ठांची बैठक झाल्यावरच येथील युती बाबत अधिकृत चित्र हे स्पष्ट होणार आहे. युती झाल्यास शिंदे शिवसेनेचा उमेदवार अंतिम होणार असून भाजपाचा उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेईल अशी चर्चा आहे.

Zilla Parishad Elections
Mahayuti unity Malvan : मालवणात महायुतीतील वाद शमला!

तसेच शिंदे शिवसेनेकडून पंचायत समिती आंबोली गणासाठी मायकल डिसोजा तर विलवडे हा भाजपाला सोडला जाईल. सोबत पं. स. करिता नामांकन केलेले अपक्ष उमेदवार आपले उमेदवारी अर्ज हे माघार ( अपवाद वगळता) घेण्याची शक्यता आहे. अशी चर्चा आहे. त्यामुळे असे झाल्यास आंबोली जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य (विलवडे पंचायत समिती वगळता) बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news