

आंबोली : आंबोली पोलीस तपासणी नाक्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 6 लाख 33 हजार 600 रुपयांच्या गोवा दारूसह 10 लाखांची पिकअप गाडी पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणी शैलेशकुमार रामभाई बारिया (रा. खरसल फलिया, गुजरात) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.गोव्यातून गुजरातला ही गोवा दारूच्या चोरट्या वाहतूक करण्यात येत होती.
आंबोली चेकपोस्टवर सर्व वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी गोव्यातून आलेली महिंद्रा पिकअप गाडी पोलिसांनी तपासणीसाठी थांबवली. तपासणी दरम्यान पिकअपच्या आतमध्ये पत्र्याचे कंपार्टमेंट दिसून आले. सदर कंपार्टमेंट उघडलेे असता आतमध्ये गोवा बनावटीच्या रॉयल व्हिस्की दारूचे 110 बॉक्स आढळून आले.
पोलिसांनी पिकअप चालक शैलेशकुमार बारिया याच्यावर विनापरवाना दारू वाहतूक केल्याचा गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले. तसेच दारू व पिकअप गाडी असा, समोर 16 लाख 33 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सावंतवाडी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण व आंबोली दूरक्षेत्र अंमलदार रामदास जाधव, पोलीस नाईक मनिष शिंदे, होमगार्ड आनंद बरागडे, चंद्रकांत जंगले यांनी केली.