

शिरोडा : आजगाव येथे रविवारी सकाळी दोन एसटी गाड्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. एक एसटीच्या ड्रायव्हरसह सुमारे 20 प्रवासी जखमी झाले. यात ड्रायव्हर गंभीर जखमी झाला असून, प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती.
राज्य परिवहनच्या वेंगुर्ला आगारची वेंगुर्ला-पणजी ही गाडी शिरोडा स्थानकातून मार्गस्थ झाल्यावर पणजीच्या दिशेने जात होती, तर सावंतवाडी - शिरोडा एसटी शिरोड्याकडे येत होती. आजगाव येथे या दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाली. यात सावंतवाडी - शिरोडा बसचा ड्रायव्हर गंभीर जखमी झाला.
तर वेंगुर्ला- पणजी बसचा ड्रायव्हर किरकोळ जखमी झाला. दोन्ही गाड्यांमधील मिळून 20 प्रवाशी जखमी झाले. यातील सात प्रवाशांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालय शिरोडा येथून सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर सावंतवाडी- शिरोडा बसचा ड्रायव्हर गंभीर जखमी असल्याने त्यांला मळेवाड आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात दोन्ही बसेसचे दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर दोन्ही बसेस रस्त्यातच उभ्या राहिल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची बातमी समजतात ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
शेवंती परशुराम पाटील (53, आजरा), नंदा नितीन कवठणकर (42, कवठणी), नमिता संकल्प शिरोडकर (28, शिरोडा), लुकमान जमील शेख (23, शिरोडा), निदा मुजावर (15, शिरोडा), संगिता संजय सावंत (49, रेडी), याकुब निरूद्दीन शेख (48, शिरोडा), मनोज कृष्णा दाभोलकर (48, दाभोली), नाजिया नईम मुजावर (42, शिरोडा), निधी अशोक नाईक (19, आरवली), सोनाली नार्वेकर (24, वेंगुर्ला), प्रज्योती पांडुरंग मांजरेकर (26, वास्को), संचाली नवसो गावडे (17, आसोली), नंदिनी आनंद कुमठेकर (32, कारवार), वासुदेव युगानंद पांगम (25, वेंगुर्ला), सुलताना बशीर थानगे (29, शिरोडा), दर्शना दशरथ मुळीक (53, मळेवाड), प्रमिला प्रभाकर मुळीक (69, सातार्डा), युक्ता ज्ञानदेव तांडेल (22, उभादांडा), रूणाली शरद कळंगुटकर (18, आसोली), विष्णू विठ्ठल तुळसकर (65, सातार्डा).