आजगाव दत्तवाडी येथे सेंट्रींग प्लेट्सची चोरी

Sindhudurg Theft News | अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल
Sindhudurg Theft News |
घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला.Pudhari Photo
Published on
Updated on

वेंगुर्ले : आजगाव दत्तवाडी येथील रहिवासी राकेश रमाकांत सावंत (वय 31) यांच्या घराशेजारी ठेवलेल्या 150 लोखंडी पत्र्याच्या सेंट्रींग प्लेट्स चोरीला गेल्याची घटना घडली. त्याची एकूण किंमत 45 हजार रुपये इतकी आहे. ४ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता ते 5 जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी राकेश सावंत यांनी वेंगुर्ले पोलीस स्थानकात चोरीची फिर्याद दिली.

आजगाव येथील राकेश सावंत हे बांधकामास लागणारे सेंट्रींग प्लेट्स भाड्याने देतात. या घटनेचा शिरोडा पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस हवालदार ए.पी. हडकर, हवालदार योगेश राऊळ यांनी पंचनामा केला. दाखल फिर्यादीनुसार अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेंगुर्ले पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस हवालदार योगेश राऊळ हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news