Pinguli Wildlife | पिंगुळीत आढळली आफ्रिकन गोगलगाय प्रजात!

जिल्ह्यातील पहिलीच नोंद : रॅपिड रेस्क्यू टीमचे सदस्य अनिल गावडे यांची माहिती
Pinguli Wildlife
आफ्रिकन स्नेल (गोगलगाय).(Pudhari File Photo)
Published on
Updated on

काशिराम गायकवाड

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावात आफ्रिकन गोगलगाय (ॠळरपीं अषीळलरप डपरळश्र - ङळीीरलहरींळपर र्षीश्रळलर) आढळून आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आफ्रिकन स्नेलची ही पहिलीच नोंद झाली आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र कुडाळच्या रॅपिड रेस्क्यू टीमचे सदस्य अनिल गावडे यांनी दिली आहे. त्यांनी हा नमुना स्वतः निरीक्षण करून नोंदवला आहे. या गोगलगायीला स्थानिक पातळीवर मोठी गोगलगाय किंवा परदेशी गोगलगाय असेही म्हटले जाते.

आफ्रिकन स्नेल ही जगातील 100 सर्वात कुख्यात आक्रमक प्रजातींपैकी एक मानली जाते. ही साधारण 10-15 सें.मी. पर्यंत वाढू शकते आणि जगातील सर्वांत मोठ्या स्थलांतरित गोगलगायांपैकी ती एक आहे.

ही प्रजाती अत्यंत प्रजननक्षम असून एकावेळी 100 ते 400 अंडी घालते आणि वर्षाला अनेकवेळा अंडी देऊ शकते. माती, झाडे, शेतीमाल, वाहतूक साधने यांच्यामार्फत फार जलदगतीने ती सगळीकडे पसरते. एकदा नवी जागा मिळाल्यावर त्या ठिकाणी स्थानिक प्रजातींना बाहेर ढकलून स्वतःचे वर्चस्व निर्माण करते. विशेषतः पाने, कोवळी फांदी, फळे व मुळे यांवर हल्ला केल्याने पिकांतून मिळणारे एकूणच उत्पन्न ढासळण्याची दाट शक्यता असते.

Pinguli Wildlife
Kudal Journalist Award | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारिता चिकित्सक!

महाराष्ट्रात यापूर्वी सांगली, नागपूर, चंद्रपूर, पुणे, औरंगाबाद व कोल्हापूर जिल्ह्यांत या प्रजातीची उपस्थिती नोंदली गेली आहे, ज्यात विशेषतः भात, ऊस आदी पिकांना मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पहिलीच नोंद असून फुलझाडे किंवा फळझाडे यांच्या वाहतुकीदरम्यान या प्रजातीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांमध्ये प्रवेश झाला असावा असे अनिल गावडे यांनी म्हटले आहे.

Pinguli Wildlife
Kudal News | नदीपात्रातील मृतदेह काढण्यासाठी शासकीय यंत्रणा सरसावली!

या प्रजातीच्या प्रसाराबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात असून सिंधुदुर्गतील हवामान या आक्रमक प्रजातीसाठी अनुकूल ठरण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यामुळे भविष्यात या प्रजातीचा प्रसार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृषी, पर्यावरण आणि जैवविविधतेसाठी धोकादायक ठरणार्‍या या प्रजातीच्या नियंत्रणासाठी स्थानिक प्रशासन, शेतकरी आणि नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज असल्याचे अनिल गावडे यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news