Achra News | हुलकावणी दिल्याच्या रागातून कारचालकासह तीन महिलांना मारहाण

चिंदर येथील दुचाकीस्वारावर गुन्हा
Achra News
आचरा : अपघात ग्रस्त कार (Pudhari File Photo)
Published on
Updated on

आचरा : हुलकवणी दिल्याच्या रागातून दुचाकीस्वार व कारचालक यांच्यात वाद झाला. या वादात दुचाकीस्वाराने कारचालक आणि कारमधील त्याच्या नातेवाईक असलेल्या तीन महिलांना मारहाण केल्याची घटना चिंदर बाजार येथे मंगळवारी रात्री घडली. या मारहाणीत त्या महिला जखमी झाल्या. जखमी महिलांना आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून सोडण्यात आले. याबाबत कारचालकाने दिलेल्या तक्रारीवरून आचरा पोलिसांनी चिंदर बाजार येथील जेरी फॉरेन्स फर्नांडीस (39) या दुचाकीस्वरावर गुन्हा दाखल केला आहे.

या मारहाणप्रकारणी कारचालक चैतन्य वसंत सावंत (रा. कोलझर- दोडामार्ग) यांनी आचरा ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी फिर्यादित म्हटले आहे, आपण व आपल्या नातेवाईक तीन महिला असे चौघेजण कारने आचरा ते कणकवली जात होतो. चिंदर बाजार दरम्यान एक दुचाकीस्वार हा कारला ओहव्रटेक करून पुढे गेला.

Achra News
Sindhudurg News | आचरा-पारवाडी येथील कोळंबी प्रकल्पावर अज्ञाताकडून विषप्रयोग; १८ लाखांची कोळंबी मृत

लागलीच तो पुन्हा दुचाकी वळवत करच्या बाजूने गाडी चालवत कार थांबवण्याचा इशारा करू लागला आणि दुचाकी कारला घासून चालू लागला. आपण कार थांबवली असता त्याने कारच्या खिडकीतून हात घालत माझी कॉलर पकडत मला हूल देतोस काय? असे विचारत शिव्या देत मला कार बाहेर खेचले व हाताच्या ठोश्याने व लाथानी मारू लागला. त्यावेळी माझ्या गाडीतील नातेवाईक महिला मला सोडवण्यासाठी आल्या असता दुचाकी स्वाराने त्यांनाही लाथाबुक्क्यानी मारहाण करत जखमी केले.

Achra News
आचरा इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवास प्रारंभ

घटना घडल्याचे समजल्यानंतर आचरा पोलिस स्थानकाचे तुकाराम पडवळ, मिलिंद परब, विशाल वैजलं, मनोज पुजारे यांनी धाव घेतली. कारचालकासह जखमी महिलांना पोलिसांनी आचरा आरोग्यकेंद्रात हालवलेे.

कारचालक सावंत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दुचाकीस्वार जेरी फर्नांडीस याच्यावर भारतीय न्याय संहिता नुसार कलम 115, 324 (2), 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Achra News
Sindhudurg Fishermen Subsidy News | मच्छीमार नौकाधारकांना डिझेल प्रतिपूर्ती अनुदान मंजूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news