वैभववाडीत स्टॉलधारक महिलेचा डिझेल अंगावर ओतून आत्महत्येचा प्रयत्न

नगरपंचायतीच्या स्टॉल हटाव कारवाईवेळी प्रकार
Anjali Sivagan while pouring diesel on her body in front of Municipal Corporation employees.
नगरपंचायत कर्मचार्‍यांसमोर अंगावर डिझेल ओतून घेताना अंजली शिवगण. Pudhari Photo
Published on
Updated on

वैभववाडी, पुढारी वृत्तसेवा : वैभववाडी नगरपंचायतीच्या स्टॉल हटाव कारवाई विरोधात न.प.च्या कर्मचार्‍यांसमोर स्टॉलधारक महिलेने अंगावर डिझेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल यांच्यासमोर स्टॉल धारक महिलेने आपली कैफियत मांडली.अखेर पोलिसांच्या सहकार्याने स्टॉलधारक महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

Anjali Sivagan while pouring diesel on her body in front of Municipal Corporation employees.
सिंधुदुर्ग : कुडाळ-कविलकाटे परिसरात भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात १५ जखमी

वैभववाडी बाजारपेठेत गेली 40 वर्षापासून स्टॉलमध्ये शिवणकाम करून कुटुंबाच्या उदरनिर्वाह करताना स्टॉल हटावमुळे माझ्यावर उपासमारीची वेळ आली तरी शासनाने व्यावसायाकरिता स्टॉल लावण्याची परवानगी द्यावी अशी मागणी अंजली शिवगण यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.मात्र अद्याप न.पं.प्रशासनाने त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून न दिल्याने गेल्या काही दिवसापासून त्यांनी पुन्हा न.पं.जवळील फुटपाथ वर विना स्टॉल उघड्यावर शिलाई मशीन ठेवून त्या आपला व्यवसाय करत होत्या.पावसामुळे उघड्यावर शिलाई काम करणे अशक्य असल्याने त्यांनी आपला स्टॉल पुन्हा फुटपाथवर मांडून व्यवसाय करण्यास सुरुवात केली होती. शुक्रवारी न.प.चे कर्मचारी स्टॉलच्या समोर दाखल झाल्यानंतर अंजली यांनी अंगावर डिझेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तिची समजूत काढत तात्पुरता या घटनेवर पडदा पडला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news