सिंधुदुर्ग : नववर्ष स्वागत यात्रेने मालवणनगरी दणाणली; चित्ररथ, वेशभूषेतून महाराष्ट्रीयन संस्कृतिचे दर्शन | पुढारी

सिंधुदुर्ग : नववर्ष स्वागत यात्रेने मालवणनगरी दणाणली; चित्ररथ, वेशभूषेतून महाराष्ट्रीयन संस्कृतिचे दर्शन

मालवण; पुढारी वृत्तसेवा : चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी तोरणानी मालवण नगरी सजली असताना मालवण शहर बाजारपेठ मार्गांवरून निघालेल्या भव्यदिव्य स्वरूपातील हिंदू नववर्ष स्वागत यात्रेने मालवण नगरी दाणाणून गेली. पारंपरिक वेशभुषेतील कलावंत यांच्या सहभागातील बार्देश शिमगोत्सव समिती गोवा येथील ढोल-ताशा पथक विशेष आकर्षण ठरले.

यावर्षी स्वागत यात्रेचे हे 21 वे वर्ष होते. दरवर्षी प्रमाणे हिंदूप्रेमी व मालवणवासीय यांच्या उत्स्फूर्त सहभागातून भव्यदिव्य स्वरूपात मंगळवार 9 एप्रिल सायंकाळी 5 : 30 वाजता भरड दत्त मंदिर येथून स्वागत यात्रा निघाली. माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते स्वागत यात्रेचे उदघाटन श्रीफळ वाढवून करण्यात आले.तर बार्देश शिमगोत्सव समिती गोवा ढोल पथकाचे स्वागत आमदार वैभव नाईक यांनी केले.यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सर्वत्र स्वागत यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

यावेळी यात्रा संयोजक भाऊ सामंत, दत्ता सामंत, विजय केनवडेकर, धोंडी चिंदरकर, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, बबन शिंदे, गणेश कुशे, महेश कांदळगांवकर, पुजा करलकर, प्रमोद करलकर, ममता वराडकर, राजु बिडये, मंदार लुडबे, महेश सारंग, दादा वेंगुर्लेकर, सुरेश बापार्डेकर, मंदार लुडबे, परशुराम पाटकर हरी खोबरेकर, बबन शिंदे, बंटी केनवडेकर, मंदार केणी, यतीन खोत, शिल्पा खोत, सिया धुरी, सन्मेष परब, सेजल परब, बाबी जोगी, नरेश हुले, किरण वाळके, बबन परुळेकर, उमेश मांजरेकर, आकांक्षा शिरपूटे, अमित खोत, प्रशांत हिंदळेलर, रत्नाकर कोळंबकर, तपस्वी मयेकर, भाई कासवकर, सिद्धेश मांजरेकर सौगंधराज बादेकर, पंकज सादये, शेखर गाड, संदिप बोडवे, अविनाश सामंत, मनस्वी कदम, आर्या गावकर यांसह अन्य उपस्थित होते.

मालवण वासियांच्या एकत्रित सहभागातून व सहकार्यातून निघणारी ही स्वागत यात्रा दरवर्षी भव्यदिव्यता वाढत जाणारी अशीच ठरते. या ही वर्षी ही स्वागत यात्रा अधिक भव्यदिव्य स्वरूपात होती. सर्वांच्या सहभागातून नियोजनातून यात्रा यशस्वी ठरली.

महाराष्ट्रीयन संस्कृतिचे दर्शन

यावर्षी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा निमित्त निघणाऱ्या भव्यदिव्य शोभयात्रेत मोठमोठे ढोल, पारंपरिक वेशभुषेतील कलावंत यांच्या सहभागातील बार्देश शिमगोत्सव समिती गोवा येथील ढोल-ताशा पथक विशेष आकर्षण ठरले. सोबत स्थानिक कलाकार यांच्या सहभागातून ऐतिहासिक चित्ररथ, सोबत घोडे, चार गटातील विविध वेशभूषा स्पर्धक यांसह महाराष्ट्रीय संस्कृतिचे दर्शन विविध ग्रुपच्या माध्यमातून करण्यात आले. हिमालयीन ध्यानयोग ध्यान केंद्र सदस्य या स्वागत यात्रेत उत्स्फूर्त पणे सहभागी झाले होते. त्यांच्याच हस्ते स्वागत यात्रेच्या सुरवातीला ध्वज पूजन करण्यात आले. एकूणच भगव्या उत्साहातील भव्यदिव्यता हिंदू नववर्ष स्वागत यात्रा माध्यमातून याची देही याची डोळा सर्वांनी अनुभवली.

भरड दत्त मंदिर येथून स्वागत यात्रेची सुरवात होऊन बाजारपेठ, फोवकांडा पिंपळ मार्गे मामा वरेरकर नाट्यगृह परिसर येथे रात्री स्वागत यात्रेची सांगता झाली.

Back to top button