Sindhudurg Lok Sabha : लोकसभेसाठी ७ मे रोजी मतदान; सिंधुदुर्गमध्ये प्रशासकीय यंत्रणा सज्ज : जिल्हाधिकारी किशोर तावडे | पुढारी

Sindhudurg Lok Sabha : लोकसभेसाठी ७ मे रोजी मतदान; सिंधुदुर्गमध्ये प्रशासकीय यंत्रणा सज्ज : जिल्हाधिकारी किशोर तावडे

ओरोस; पुढारी वृतसेवा : १६वी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता आजपासून लागू झाली असून देशात तिसरा आणि राज्यात पाचव्या टप्पातील सिंधुदुर्ग रत्नागिरीजिल्ह्याचे मतदान ७ मे मतदान होणार आहे त्या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आले आहे ,राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या निबंधा प्रमाणे अमलबजावणी करण्यात येत असून होळी , रामनवमी यासह धार्मिक कार्यक्रमांसाठी घालून दिलेल्या नियमाच्या अधीन राहून हे कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रशासन सहकार्य करीत असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सिंधुदुर्ग नगरी येथे भारत निवडणूक आयोगाने आचारसंहिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी प्रभारी अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र मठपती , निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे , उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, आदींसह उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे म्हणाले राज्य निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू केली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देशात तिसऱ्या आणि महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे या निवडणुकीच्या दृष्टीने निवडणूक अधिसूचना १२ एप्रिल रोजी प्रसिद्ध होणार असून नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक १९ एप्रिल २४ नामनिर्देशन पत्राची छाननी २० एप्रिल २४ तर अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक २२ एप्रिल २०१४ असा आहे या मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार असून ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे , त्या दृष्ठीनेसिंधुदुर्ग जिल्ह्याची प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

जिल्ह्यातील ९१८मतदान केंद्रावर मतदान होणार आहे त्या दृष्टीने योग्य ती अंमलबजावणी सुरू झाली आहे ,सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ लाख ५७ हजार ७८० मतदार असून ३लाख २९ हजार ४७३ महिला तर ३ लाख २८ हजार ३०७ पुरुष मतदार आहेत कणकवली विधानसभा मतदारसंघात २ लाख २५ हजार ५ ८८ मतदार असून १ लाख ११हजार ७२० पुरुष तर १ लाख १३ हजार ८६८ महिला मतदार आहेत ,कुडाळ विधानसभा मतदारसंघात २ लाख १० हजार ३७८ एकूण मतदार असून १ लाख ४ हजार ९५२पुरुषतर १ लाख ५ हजार, ४२६ महिला मतदार आहेत , सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात २ लाख २१ हजार ८१४ एकूण मतदार असून १ लाख १ १ हजार ६३५ पुरुष तर १ लाख १० हजार १७९ महिला मतदार आहेत अजूनही पुरवणी मतदार यादी कार्यक्रम सुरू असून राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पुरवणी मतदार यादी त्या त्या मतदान केंद्रांवर देण्यात येणार आहे जेणेकरून कोणीही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही या दृष्टीने खबरदारी घेण्यात येत आहे.

राज्य निवडणूक आयोगाने सूचित केल्यानंतर ८५ वयोगटापेक्षा जास्त असलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी त्यांनी त्याप्रमाणे अर्ज भरून दिल्यास मतदानादिवशी त्याचे घरी मतदान करून घेणे शक्य होईल तसेच अशाच प्रकारे दिव्यांग व्यक्तींसाठी ही मतदानासाठी सोय निवडणूक आयोगाने केली आहे त्याची अंमलबजावणी त्या त्यावेळी योग्य पद्धतीने करण्यात येणार आहे .

जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटातील ५७५९ मतदार असून ३९३ पुरुष तर २६६६ महिला मतदार आहेत यामध्ये कणकवली मतदारसंघात ११९२ तरुण तर ९६२ तरुणी असे २१५४ तरुण मतदार आहेत तसेच कुडाळ विधानसभा मतदारसंघात १००० तरुण मतदारांमध्ये तरुण पुरुष तर ८५७ तरुणी मतदार आहेत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात १ ७ ४८ तरुण मतदार असून ९०१ तरुण-पुरुष तर ८४७ तरुणी महिला मतदार आहेत.

या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये एप्रिल मे मध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात मंदिरांमधील धार्मिक कार्यक्रम होतात तसेच होळी, रामनवमी सारखे गावागावात उत्सव होणार आहेत या कार्यक्रमांसाठी निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या निर्बंधाप्रमाणे संबंधित विश्वस्तानमार्फत योग्य ती खबरदारी घेण्याबाबतच्या सूचना दिल्या जातील असेही यावेळी स्पष्ट केले .

रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शांततापूर्ण वातावरणात निवडणूक पार पडावी या दृष्टीने प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रमुखांना आपापल्या भागातील पक्षाचे बॅनर, झेंडे काढावेत व योग्य ती आचारसहिता पाळावी या दृष्टीने पत्र देण्यात येत असून त्या दृष्टीने योग्य ती अंमलबजावणी केली जाईल.

खाजगी प्रिंटिंग प्रेस मध्ये पक्षाची छपाई करून देण्याबाबत दोन फॉर्म भरून घेण्यात येणार असून त्यांनी योग्य ती आचारसंहिता निर्बंध पाळावे या दृष्टीने सूचना देण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Back to top button