मुंबई गोवा महामार्गावरील ओरोस खर्येवाडी येथे बनावट दारुने भरलेला टेम्पो जप्त; सिंधुदुर्गनगरी पोलिसांची कारवाई | पुढारी

मुंबई गोवा महामार्गावरील ओरोस खर्येवाडी येथे बनावट दारुने भरलेला टेम्पो जप्त; सिंधुदुर्गनगरी पोलिसांची कारवाई

ओरोस; पुढारी वृतसेवा : मुंबई गोवा महामार्गावरील ओरोस खर्येवाडी येथे बनावट दारुने भरलेल्या टेम्पोवर सिंधुदुर्गनगरी  पोलिसांनी करावाई केली. या कारवईत ५३ लाख रुपायांच्या मुद्देमालासह वाहन जप्त केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ४ मार्च रोजी एका टेम्पोमधून गोवाबनावटीची दारु गोवा-मुंबई महामार्गाने वाहतूक होणार असलेबाबत खात्रीशीर माहिती  पोलिसांना मिळाली. त्यानुसार गोवा ते मुंबई जाणारे महामार्गावर ओरोस, खर्येवाडी येथे सापळा रचून सकाळी १०.३५ वाजताच्या सुमारास गोव्याकडून मुंबईच्या दिशेने निघालेल्या टेम्पोची (क्रमांक MH-07-AJ-6059) तपासणी केला. हा टेम्पो गोवा बनावटीच्या दारुने भरलेले आढळून आला. पोलिसांनी या टेम्पो चालकाची अधिक चौकशी केली. तसेच टेम्पोतून ८२८ पुठ्याचे बॉक्स, त्यामध्ये ३८,४३,६००/- रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारु व १५,00,000/- रुपये किंमतीचा टेम्पो असा मिळून एकूण ५३, ४३, ६00/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

निक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग पोलीस निरीक्षक सचिन हंदळेकर, सहा. पोलीस निरीक्षक महेंद्र घाग,  सहा. पोलीस निरीक्षक रामचंद्र शेळके, पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार लक्ष्मण साळुंके, प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, प्रमोद काळसेकर, बस्त्याव डिसोजा, अमित तेली, चंद्रकांत पालकर, जयेश सरमळकर, चंद्रहास नार्वेकर, यशवंत आरमारकर या पथकाने ही कारवाई करण्यात आली. सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे गु.र.नं. १९/ २४, महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (अ) (ई) अन्वये संबंधित ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणेकडून करण्यात येत आहे.

Back to top button