सिंधुदुर्ग : तुळस देऊळवाडी येथे भीषण आगीत घर जळून खाक

सिंधुदुर्ग : तुळस देऊळवाडी येथे भीषण आगीत घर जळून खाक

वेंगुर्ले; पुढारी वृत्तसेवा : वेंगुर्ले तालुक्यातील तुळस देऊळवाडी येथे एका घराला अचानक आग लागल्याची घटना आज (दि. 28) सायंकाळी घडली. या दुर्घटनेत संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी पडले आहे. यात पेडणेकर यांचा पखवाज व तबला दुरुस्तीचा व्यवसाय पूर्णपणे बेचीराख झाला आहे. यामुळे सुमारे 10 ते 12 लाख रुपयांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच तुळस देव जैतीर देवस्थानचे मानकरी, सदस्य, पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रसंगावधान राखत घरातील त्यांच्या आईला वाचविले. दरम्यान कोणतीही जीवितहानी झाली नाही.

वेंगुर्ले पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ सहाय्यक अजय नाईक यांनी वेंगुर्ले पोलीस स्थानक तसेच वेंगुर्ले नगरपरिषदला या दुर्घटनेची माहिती दिली. त्यानंतर लगेचच वेंगुर्ले नगरपरिषदचा अग्निशमन बंब व सुधीर झाट्ये यांचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमनच्या सहाय्याने आग विझविण्याचे काम सुरु होते. वेंगुर्ले पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी त्वरित दाखल झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही, तर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. दरम्यान नव्याने उभारलेला पेडणेकर यांचा पारंपरिक व्यवसाय आगीच्या भक्षस्थानी पडल्याने शासन स्तरावरून त्वरित आर्थिक मदत होणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news