Devgad Beach : देवगड समुद्र किनाऱ्यावर पुण्यातील सहा मुले बुडाली, चौघांचा मृत्यू | पुढारी

Devgad Beach : देवगड समुद्र किनाऱ्यावर पुण्यातील सहा मुले बुडाली, चौघांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : देवगड समुद्र किनाऱ्यावर ६ मुले बुडाल्याची घटना आज घडली. हे सर्वजण पुणे येथील खासगी सैनिकी अकादमीतील मुले असल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये चार जाणांचा मृत्यू झाला तर, एकजण बेपत्ता आहे. एकावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. शनिवारी (दि. ९) सायंकाळी घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

पुण्याती येथील संकल्प सैनिक अकॅडमीतील ३६ जणांची सहल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे आली होती. यापैकी सहा जण देवगड समुद्रात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाल्याची प्राथमिक माहिती आहे. यापैकी पाच जणांना समुद्राच्या बाहेर काढण्यात यश मिळवले असून यापैकी एक अद्यापही देवगड समुद्रामध्ये बेपत्ता आहे. बाहेर काढण्यात आलेल्या पाचपैकी चोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.

पायल बनसोडे, अनिशा पडवळ, प्रेरणा डोंगरे, अंकिता गारटे अशी मृत मुलांची नावे आहे. आकाश तुपे या मुलावर ग्रामीण रुग्णालय देवगड येथे उपचार सुरू आहेत. तर राम डीचोलकर हा मुलगा अद्याप सापडलेला नाही. त्याचा शोध सुरू आहे. ही सर्व सहाजण १८ ते २४ वर्षे वयोगटातील आहेत.

Back to top button