Jarange Patil : मनोज जरांगे पाटील लवकरच सिंधुदुर्गात!

मनोज जरांगे-पाटील
मनोज जरांगे-पाटील

मालवण; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची डिसेंबर महिन्यात सिंधुदुर्गात जाहीर सभा होणार आहे. या सभेला मालवण तालुक्यातून २५००० समाज बांधव सहभागी होतील असा निर्धार मालवण येथील मराठा समाजाच्या सभेत मराठा समाज बांधवांनी केला केला.

डिसेंबर महिन्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जाहीर सभा होणार आहे.या सभेच्या नियोजनासाठी मालवण तालुका मराठा समाजाची बैठक बाबा सावंत यांच्या नेतृत्वाखाली राठीवडे येथे कृष्ण विलास हॉलमध्ये रविवारी संपन्न झाली. यावेळी मराठा महासंघ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुहास सावंत यांनी मराठा समाज बांधवांना मार्गदर्शन केले. यावेळी बाबा सावंत, अरुण भोगले, विनायक परब, सरपंच दिव्या धुरी, करुणा पुजारे, शोभा पांचाळ, शिवराम पालव, सुबोध पालव, तुकाराम लाड, अजय परब, अभय भोगले, चंद्रकांत कदम, रवींद्र बागवे, संदेश धुरी, प्रदीप सावंत, रामचंद्र राऊत, विलास कासले, संदीप सावंत, गोविंद सांडव, मनोहर कासले, श्यामसुंदर घाडी, श्रीकांत बागवे, अविराज परब, उदय पुजारे, विजय कदम, संदीप तेजम, प्रशांत सावंत, स्वप्निल पुजारे, प्रकाश कासले, प्रशांत परब, बाळा धुरी, गोविंद सावंत, अशोक पालव, नामदेव पुजारे, अनंत पताडे, गोपीनाथ पालव, सोनू वळवे, रघुनाथ धुरी, गणेश धुरी, विजय धुरी, सोनू पुजारे, श्यामसुंदर धुरी,गंगाराम धुरी आदी समाज बांधव आणि भगिनी उपस्थित होते

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news