सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यात जमीनीच्या वादातून सख्ख्या भावांमध्ये हाणामारी, फावड्याच्या वारात तुटले बोट | पुढारी

सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यात जमीनीच्या वादातून सख्ख्या भावांमध्ये हाणामारी, फावड्याच्या वारात तुटले बोट

कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : वडिलोपार्जित जमीनीच्या वादातून कुडाळ तालुक्यातील रांगणातुळसुली ख्रिश्चनवाडी येथे दोन सख्ख्या भावांमध्ये मारहाणीचा प्रकार घडला. यामध्ये मोठ्या भावाने फावड्याने केलेल्या वारामुळे लहान भावाच्या हाताचे बोट तुटून पडले.  शरद रामचंद्र गोवेकर (वय ५१) असे जखमी व्यक्तीचे नाव असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.

रांगणातुळसुली ख्रिश्चनवाडी येथे बुधवारी (१५ नोव्हेंबर) सायंकाळी दोन भावांमध्ये हाणामारी झाल्याची  कुडाळ पोलिसांत देण्यात आली. या तक्रारीवरून तिघांवर कुडाळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरद रामचंद्र गोवेकर यांची वडिलोपार्जित जमीनीचे वाटप केल्यानुसार जमीनत वहिवाट आहे. तरीही शरद यांचा भाऊ महादेव रामचंद्र गोवेकर (वय ६६) हे शरद व त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान बुधवार (दि 15 नोव्हेंबर) सायंकाळी शरद हे आपल्या घराकडून आपल्या सासरवाडीला जात असताना वाटेत जाणाऱ्या पायवाटेवर त्यांचा सख्खा भाऊ महादेव याने नांगरून जाण्या-येण्याचे वाटेवर अडथळा निर्माण केला. शरद यांनी विचारणा केली या रागातून भाऊ महादेव यांनी हातातील फावड्याने शरद यांच्या डोक्यावर मारले. यावेळी  उजव्या हाताचे बोटांना मार लागून त्यांचे मधले बोट तुटले. तसेच डोक्यातही  मार लागून गंभीर दुखापत झाली आहे. मुलगा हर्षद यालाही मार लागला.

संबंधित बातम्या

या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे करत आहेत. दरम्यान वडिलोपार्जित जमीन जागेच्या वादातून दोन सख्खे भाऊ पक्के वैरी बनून एकमेकांच्या जीवावर बेतण्याईतपत मारहाण केल्याने या घटनेची या परिसरात चांगलीच चर्चा रंगली होती. दरम्यान शरद रामचंद्र गोवेकर यांना कुडाळ ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.

Back to top button