Sindhudurg News : सिंधुदुर्गनगरी-मालवण मार्ग चौपदरीकरणासाठी ३५० कोटींची तरतूद

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व शिवसृष्टी, व्यापारी संकुलासाठी १९ कोटी मंजूर
Sindhudurg News
पत्रकार परिषदेत बोलताना काका कुडाळकर व अन्य.
Published on: 
Updated on: 

ओरोस : सिंधुदुर्गनगरी येथील शिवसृष्टी परिसर सुशोभीकरणासाठी ८कोटी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी २ कोटी असा १० कोटीचा निधी तसेच व्यापारी संकुल उभारण्यासाठी ९ कोटी, असा निधी आ. नीलेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले आहे. तसेच सिंधुदुर्गनगरी ते मालवण मार्गाच्या चाैपदरीकरणासाठी ३५० कोटी तरतूद केल्याची माहिती जि. प. माजी अध्यक्ष काका कुडाळकर यांनी दिली.

सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ओरोस उपसरपंच पांडू मालडकर, नागेश ओरोसकर, शाखाप्रमुख मदन परब, विलास हडकर, प्रकाश देसाई, प्रशांत राणे, सुशील निब्रे, नीलेश ओरसकर आदीं उपस्थित होते. काका कुडाळकर म्हणाले, सिंधुदुर्गनगरीच्या विकासासाठी आ. नीलेश राणे यांचे प्रयत्न सुरू आहेत, त्याला आता गती आली आहे. सिंधुदुर्गनगरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा सुमारे ४२ फुट उंचीचा पुतळा उभारण्यासाठी २ कोटी रुपये आणि पुतळा परिसरा सुशोभीकरण करण्यासाठी ८ कोटी रुपये ­­­खर्च होणार आहेत त्या दृष्टीने अंदाजपत्रक मंजूर होऊन आर्किटेक आणि पुतळा व सुशोभीकरण शिवसृष्टीसाकारणार आहे. यासाठी सिंधू रत्न योजनेतूनही निधी तरतूद केली असल्याचे श्री. कुडाळकर म्हणाले.

सिंधुदुर्गनगरीतील व्यापारी मंडळाच्या अनेक वर्षांच्या समस्यांकडेही आ. राणे यांनी लक्ष देऊन दोन दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून १६०० स्क्वेअर फुट ऐवजी ३३०० स्केअर फुटाचे व्यापारी संकुल उभारण्यासाठी ९ कोटीची तरतूद केली आहे. या व्यापारी संकुलाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देशही आ. राणे यांनी दिले आहेत. जिल्हा मुख्यालय असलेले सिंधुदुर्गनगरी हे विकसित शहर म्हणून उदयास यावे या दृष्टीने आ. राणे लक्ष ठेवून असून येथील प्रश्नांना न्याय देत आहेत.

मालवण हे पर्यटनाच्या दृष्टीने देश विदेशात नावारूपास आलेले शहर आहे. शहराला जिल्ह्याचे मुख्यालय सिंधुदुर्गनगरीशी जोडणाऱ्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार असून एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून यासाठी ३०५ कोटी रुपये प्राप्त होणार आहेत. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन या प्रकल्पाचे सादरीकरणही केले आहे. या मार्गावर आवश्यक ठिकाणी निवारा शेड ही उभारण्यात येणार आहेत. सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत मंजुरीसाठी ही पालकमंत्री नीतेश राणे व आ. निलेश राणे यांचे प्रयत्न असून त्याला लवकरच मंजुरी मिळेल, असा विश्वास श्री. कुडाळकर यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news