कणकवली स्टेशनवर अडकलेल्या 513 प्रवाशांसाठी 12 एस.टी. बसची सोय

मुसळधार पावसामुळे गैरसोय झालेल्या प्रवाशासाठी खास सोय
12 ST for 513 passengers stuck at Kankavali station. Bus facility
कणकवली ः एसटी बसमधून मुंबईला जाताना रेल्वे प्रवासी.Pudhari Photo

कणकवली ः पुढारी वृत्तसेवा

कोकण रेल्वे मार्गावर खेड-दिवाणखवटी येथे दरड आल्याने रविवारी सायं. 6 वा. पासून बंद झालेली रेल्वे वाहतूक तब्बल 22 तासानंतर सोमवारी सायं. 4 वा.च्या सुमारास सुरू झाली. रेल्वे मार्ग बंद झाल्याने सोमवारी पहाटे 4.45 वा. पासून कणकवली स्टेशनवर थांबलेल्या मेंगलोर-सीएसटीएम एक्सप्रेसमधील एकूण 513 प्रवाशांना 12 एसटी गाड्यांमधून मुंबईकडे रवाना करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी 4.25 वा. ही एक्स्प्रेस पुन्हा मंगलोरच्या दिशेने पाठविण्यात आली. सोमवारी सायंकाळी मुंबईच्या दिशेने जाणार्‍या रेल्वे गाड्या उशिराने धावत होत्या.

12 ST for 513 passengers stuck at Kankavali station. Bus facility
नाशिक : जिल्ह्यात ‘या’ 17 मार्गांवर पावसामुळे एसटी बंद

रविवारी सुटलेल्या जनशताब्दी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, कोकण कन्या एक्सप्रेस आणि तुतारी एक्सप्रेस या गाड्या रत्नागिरीपर्यंत आणून रद्द करण्यात आल्या आहेत तर सोमवारी सुटणार्‍या काही गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. यामध्ये मडगाव- एलटीटी ही मडगाव येथून सायं.6.30 वा.. मडगाव-सीएसटीएम जनशताब्दी एक्सप्रेस मडगावहून रात्र 8. 30 वा. मडगाव -सीएसटीएम कोकण कन्या एक्सप्रेस मडगावहून रात्री 11.30 वा. तर सावंतवाडी- दादर तुतारी एक्सप्रेस सावंतवाडीहून रात्र 10.30 वा. सोडण्यात आली.

12 ST for 513 passengers stuck at Kankavali station. Bus facility
युद्धविरामाला पुन्‍हा ‘खो’? हमासने प्रस्‍तावात सुचवलेली ‘दुरुस्ती’ इस्‍त्रायलला अमान्‍य

रेल्वे मार्ग बंद झाल्याने विविध स्टेशनवर 10 ते 12 तास उभ्या असलेल्या गाड्यांमधील प्रवाशांना काही ठिकाणी भोजन आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व स्टेशनवरील उपहारगृहांना सेवा सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. कणकवली येथे रखडलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबईपर्यंत पोहोचवण्यासाठी 12 एसटी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली. अपंग आणि आजारी प्रवाशांसाठी एका स्लीपर गाडीची व्यवस्था करण्यात आली. कोकण रेल्वे, एसटी विभाग आणि महसूल विभागाच्या समन्वयाने या एसटी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली. यासाठी कणकवली एसटी डेपोच्या 6 गाड्या, मालवण डेपोच्या 4 गाड्या, देवगड डेपोची 1 गाडी आणि वेंगुर्ले डेपोची 1 गाडी प्रवाशांच्या सेवेसाठी वापरण्यात आली. या गाड्या कणकवली रेल्वेस्टेशन ते मुंबई सेंट्रलपर्यंत सोडण्यात आल्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news