कुडाळ : पुढारी वृत्तसेवा सोसाट्याच्या वाऱ्याचा कुडाळ तालुक्याला फटका बसला. येथील रहिवासी शाबिर मुजावर यांच्या घरावरील पत्रे उडून गेले, तसेच घरातील फ्रिज, वॉशिंग मशीन आदी साहित्यासह अन्य वस्तूंचे मोठे नुकसान झाले. ऐन पावसाच्या तोंडावर घर व अन्य साहित्याचे नुकसान झाल्याने मुजावर कुटुंबिय चिंतेत सापडले आहे.
सिंधुदुर्गात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस आणि सोसाट्याचा वारा कमी-अधिक प्रमाणात सुरू आहे. आज (सोमवार) सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे मुस्लिमवाडीला जोरदार वादळाने विळका घातला. यात मुस्लिमवाडी येथे राहणारे शाबिर मुजावर यांच्या घरावरील पत्रे उडून गेले. तसेच घरातील फ्रिज, वॉशिंग मशीन, पलंग यांचे जवळपास १ लाख रुपयांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच वेताळ बांबर्डे सरपंच सौ. वेदिका दळवी व उपसरपंच प्रदीप गावडे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
हेही वाचा :