

ओरोस; पुढारी वृत्तसेवा : ओरोस सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयानजीक निवासी संकुलामधील एका बंद इमारतीत अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत आतील साहित्य जळून खाक झाले, त्याचबरोबर भिंती देखील पडल्या. काही महिन्यापूर्वी डागडूजी केलेल्या इमारतीला तडे गेले होते. कुडाळ, मालवण येथील अग्निशामक दलाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
जिल्हा रुग्णालय परिसरातील निवासी संकुल इमारतीला भरदुपारी आग लागून आतील साहित्य जळून खाक झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी कुडाळ येथून अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. कुडाळ पाठोपाठ मालवण येथील अग्नीशामक बंब दुपारी ३.३० च्या सुमारास दाखल झाला. मात्र प्राधिकरणाचा टँकर पोहोचू शकला नाही. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या परिसरात अग्निशामक असावा याबाबत सातत्याने मागणी होत असताना देखील प्रशासन हलगर्जीपणा करत आहे.
दुपारी अडीच तीनच्या सुमारास जिल्हा रुग्णालय परिसरातील रस्त्यालगत असलेल्या निवासी संकुल इमारत परिसरात झाडाझुडपात आग लागल्याचे दिसून येत होते. या इमारतीमध्ये कोरोना काळातील पीपीई किट, गाद्या व अन्य साहित्य ठेवण्यात आले होते. असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागरगोजे यांनी सांगितले व सदरची इमारत निर्लेखीत केल्याचे सांगीतले परंतु गेल्या महिन्यापूर्वी दुरुस्ती रंग रंगोटी केल्याचे दिसुन येत होते. परंतुविनावापर असलेल्या या इमारतीसह निवासी संकूलातील अस्वच्छ परिसर ना दुरुस्त इमारती पाहता स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय परिसरातील आरोग्याची महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळणाऱ्या जिल्हा रुग्णालय निवासी मेडिकल इमारत परिसरात अनेक इमारती झाडाझुडपांनी वेढले आहेत. आग लागलेल्या निवासी इमारतीत सुदैवाने कोणी व्यक्ती रहात नाही.
आजूबाजूच्या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी रहिवासी राहत आहेत. गजानन पेडणेकर, सतिश जाधव ,गोट्या कोरगांवकर पोलीस कर्मचारी निरीक्षक व्हटकर, मुंडे जाधव आणि होमगार्ड यांनी तसेच मालवण आमीशामक दलाचे वैभव वळंतू सागर जाधव वसंत शिर्सेकर यांनी केलेल्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. यावेळी विजमंडळाचे कर्मचारी देखील दाखल झाले होते. सायंकाळी उशीरा सिधुदूर्ग पोलिसानी घटनेचा पंचनामा करत गुन्हा दाखल केला आहे.