देवगड : कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे श्रावणी सोमवार उत्साहात साजरे केले जातात. तब्बल ७१ वर्षानंतर यावर्षी श्रावण सोमवारीच श्रावण मासाला सुरुवात होणार आहे तसेच यावर्षी १८ वर्षानंतर पाच सोमवारचा दुग्धशर्करा योग जुळून आला असल्याची माहिती कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून देण्यात आली. हा योग साधत श्रीक्षेत्र कुणके श्वर भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.
यावर्षी श्रावण महिन्यात पाच सोमवार आले असून पहिल्या सोमवारी आ. नितेश राणे यांच्या हस्ते प्रथम पूजा होईल. दुसऱ्या श्रावणी सोमवारी विधान परिषद सदस्य आ. रवींद्र फाटक यांच्या हस्ते प्रथम पूजा होईल. गर्दी पाहता कुणकेश्वरला मिनी जत्रेचे स्वरूप प्राप्त होत असते.