Ratnagiri News : तरुणाच्‍या क्रेडिट कार्डवरून अडीच लाखांची फसवणूक

शहरातील अभ्युदयनगर येथील प्रकार
पिंपरी-चिंचवडमध्ये मालमत्ताकर भरण्यास नागरिकांचा ऑनलाईन कल
पिंपरी-चिंचवडमध्ये मालमत्ताकर भरण्यास नागरिकांचा ऑनलाईन कलPudhari
Published on
Updated on

रत्‍नागिरी : मोबाईलमध्ये अचानकपणे सिस्टीम अपडेटची प्रक्रिया सुरू होऊन तरुणाच्या क्रेडिट कार्डवरून २ लाख ५० हजार आणि बचत खात्‍यातून ४ हजार २०० रुपये असे एकूण २ लाख ५४ हजार २०० रुपये अज्ञाताने काढून घेत ऑनलाईन फसवणूक केली. हा प्रकार बुधवारी सकाळी ९.३० ते १०.३० या कालावधीत शहरातील अभ्युदयनगर येथे घडला.

याबाबत नारायण दिनेश घोलप (३४, रा. अभ्युदयनगर नाचणे रोड, रत्‍नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यानुसार बुधवारी सकाळी फिर्यादी हे घरी असताना अचानकपणे त्‍यांच्या मोबाईलमध्ये सिस्टीम अपडेटची प्रोसेस सुरू झाली. त्‍यानंतर त्‍यांच्या क्रेडिट कार्डवरून ५ ट्रॅन्झॅक्शनद्वारे एकूण २ लाख ५० हजार रुपये काढण्यात आले. तसेच त्‍यांच्या बचत खात्‍यातून ४ हजार २०० रुपये काढण्यात आल्याचा त्‍यांना मेसेज आला. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news