Youngest swimmer | चिमुकल्या जलतरणपटूचे इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड

रत्नागिरीतील 1 वर्ष 9 महिन्यांंची वेदा सरफरे ठरली भारतातील सर्वात छोटी जलतरणपटू
Veda Sarfare youngest swimmer
Ratnagiri | चिमुकल्या जलतरणपटूचे इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड
Published on
Updated on

रत्नागिरी : अवघी नऊ महिन्यांची असल्यापासून रत्नागिरीच्या शासकीय जलतरण तलावात पोहायला सुरुवात करणार्‍या रत्नागिरी तालुक्यातील कारवांचीवाडी येथील वेदा परेश सरफरे हिचा प्रवास आता फक्त 1 वर्ष 9 महिन्यांची असताना इंडियन बुक ऑफ रेकॉर्डपर्यंत पोहचला आहे. 100 मीटरचे अंतर 10 मिनिटे आणि 8 सेंकदात पूर्ण करत वेदा भारतातील सर्वात लहान जलतरणपटू बनली आहे.

वेदाचा मोठा भाऊ रूद्र शासकीय जलतरण तलावात रोज सराव करतो. तो राज्यस्तरीय स्पर्धेतही सहभागी झालेला आहे. रूद्रला घेऊन त्याची आई पायल सरफरे शासकीय जलतरण तलावावर येत होती. तिच्या कंबरेवर बसून वेदा हे जलतरण तलावातील पोहणं पहायची. एक दिवस प्रशिक्षक महेश मिलके यांनी वेदाला पाण्यात सोडलं तेव्हा ती रडली नाही तर पाण्यावर हात-पाय मारून तिने पाण्याशी दोस्तीच केली. हळूहळू ती पोहायला लागली. जलतरण तलावाच्या कठड्यावरून पाण्यात डोकावताना तिचा आत्मविश्वास दिसून वाढला. वेदाला गौरी मिलके प्रशिक्षण देत आहेत.

वेदा पोटात असताना तिची आई पायल रूद्रला जलतरण स्पर्धांना घेऊन जायची. कारवांचीवाडी येथून ती दररोज जलतरणच्या सरावासाठी जलतरण तलावावर घेऊन यायची. ती लहान असतानाही तिला जलतरण तलावावर तिची आई घेऊन यायची, असे वेदाचे वडील परेश यांनी सांगितले.

आशिया बुक, गिनिज बुकमध्ये नाव नोंदणीसाठी सज्ज

इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव आल्यानंतर आता वेदा आशिया बुक आणि गिनीज बुकात नाव नोंदवण्यासाठी सज्ज झाली असल्याचे वेदाचे वडील परेश सरफरे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news