रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या नव्या सीईओ वैदेही रानडे

Vaidehi Ranade: यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी ( निवडणूक) पदावर सेवा बजावली
New CEO Ratnagiri Zilla Parishad
वैदेही रानडे pudhari photo
Published on
Updated on

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या जागी वैदेही रानडे (भा. प्र. से.) यांची नियुक्ती केली आहे.

काही दिवसांपूर्वीच रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांची धाराशिव येथील जिल्हाधिकारी पदावर बढती होऊन बदली झाली आहे. रत्नागिरी जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बदलीनंतर या पदाचा वारसदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर गुरुवारी आय. ए. एस. दर्जाच्या अधिकार्‍यांच्या नियुक्त्यांमध्ये रत्नागिरी

जिल्हा परिषदेला नव्या सीईओ मिळाल्या आहेत. या पूर्वी त्या एमएसआरडीसी मुंबईच्या सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होत्या. नव्या सीईओ श्रीमती वैदेही रानडे यांनी यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी ( निवडणूक) पदावर सेवा बजावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news