

खेड शहर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण विभागीय संघटन संघटक तसेच राज्य सरचिटणीस व खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी खेडमध्ये केली. त्यांच्यासोबत मनसेमध्ये बडतर्फ करण्यात आलेले पदाधिकारी यांचाही पक्षप्रवेश होणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
खेड नगर परिषदेच्या निवडणुकीत जनतेमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निवडून येणारे ते पहिले नगराध्यक्ष असल्याचेही आठवण त्यांनी सांगितली. मनसेच्या स्थापनेपासून सलग पंधरा वर्षे नगरपालिकेत त्यांची सत्ता होती. त्यामुळे ते जनसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणारे नेते म्हणून ओळखले जातात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.