

चिपळूण शहर : ठाकरे शिवसेनेचे चिपळूण युवासेना प्रमुख उमेश खताते यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी, उमेश खतातेंच्या पक्षप्रवेशामुळे रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी उमेश खताते यांच्यासह विजय शिर्के, ओंकार पंडित, दीप्ती देसाई, इकबाल बेबाल, विराज खताते, समीर कदम, मुराद चौगुले, वहाब बेबल, सुमित भुरण, दीप्ती सावंतदेसांई, संदेश शिगवण, संतोष मिरगल, प्रफुल चाळके, अमित कांबळी, अमन कडवेकर, मुबारक सकवारे, दीप्ती भुरण यांच्यासह सुमारे साडेतीनशेहून कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, खा. श्रीरंग बारणे, गृहराज्यमंत्री योगेश कदम, माजी खासदार राहुल शेवाळे, शिवसेना उपनेते राजन साळवी, शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण आदी उपस्थित होते.