गुहागरमध्ये शिवसैनिकालाच उमेदवारी

पालकमंत्री उदय सामंत यांच्या दाव्यामुळे ‘सस्पेन्स’ वाढला
Uday Samant
पालकमंत्री उदय सामंत
Published on
Updated on

चिपळूण : गुहागरचा उमेदवार शिवसैनिकच असणार, असा ठाम दावा जिल्ह्याचे पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चिपळुणात पत्रकार परिषदेत केला. चिपळूण येथे प्रांत कार्यालयाच्या नवीन इमारती बांधकामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.

Uday Samant
नागपुरात महिलांसाठी एमआयडीसी, उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा

शहरातील शिक्षक पतपेढीच्या सभागृहात ही पत्रकार परिषद झाली. यावेळी शिवसेना उपनेते व माजी आ. सदानंद चव्हाण व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ना. सामंत म्हणाले, महायुती सरकारने अनेक चांगली कामे केली आहेत. त्यामुळे जनता महायुतीच्या पाठीशी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी होत आहे. आता तिसरा हप्ताही जमा होत आहे. महिलांमधून त्याला चांगला प्रतिसाद आहे. जिल्ह्यातील सर्वच जागांवर शिवसेना लढणार. मात्र, गुहागरमध्ये शिवसैनिकच उमेदवार असेल, असे त्यांनी स्पष्ट करताना सांगितले की, गुहागर विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नातेवाईक व खा. श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपूल कदम यांनी शृंगारतळीमध्ये बॅनर लावले म्हणून ते उमेदवार होत नाहीत. पक्षाने त्यांना एबी फॉर्म दिलेला नाही किंवा उमेदवारी जाहीर केलेली नाही. गुहागर मतदारसंघाबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी विस्तृत चर्चा केली आहे. त्यामुळे गुहागरमध्ये शिवसेनाच निवडणूक लढविणार, असे त्यांनी सांगत सस्पेन्स वाढविला आहे. त्यामुळे आता गुहागरचे ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात उमेदवार कोण असणार? या बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

एकीकडे भाजपचे माजी आ. विनय नातू यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपच्यावतीने मतदारसंघात काम सुरू करण्यात आले आहे. दुसरीकडे महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिंदे सेनेकडून या जागेवर दावा सांगण्यात येत आहे. यामुळे गुहागरात ठाकरेंच्या सेनेचे आ. भास्कर जाधव यांच्याविरोधात शिंदे सेनेचा उमेदवार कोण असणार? याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे. यावेळी ना. सामंत म्हणाले, खरेतर रामदासभाई कदम हे आमचे नेते आहेत. त्यांनी या विषयावर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावून बोलायला हवे होते. शिंदे साहेब नातेवाईकांना उमेदवारी देणार नाहीत. आपण त्यांच्याशी बोललो आहोत आणि या संदर्भात सविस्तर चर्चादेखील केली आहे. प्रसिद्धी माध्यमांशी चर्चा करण्याआधी कदम साहेबांनी थेट शिंदे साहेबांशी संपर्क साधायला हवा होता. कोणी बॅनर लावले म्हणून तो उमेदवार होत नाही. शिंदे साहेब नातेवाईकांना उमेदवारी देणार नाहीत. त्यामुळे शिवसैनिकच उमेदवार असेल असे ना. सामंत यांनी सांगितले.

Uday Samant
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल : उद्योगमंत्री उदय सामंत

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news