Bribery case: लाचखोरी प्रकरणातील तिघांना पोलिस कोठडीPudhari Photo
रत्नागिरी
Bribery case: लाचखोरी प्रकरणातील तिघांना पोलिस कोठडी
तक्रारदाराकडून 16, 500 रुपये घेताना रंगेहाथ पकडले
रत्नागिरी : लेखा परीक्षण अहवालातील मुद्दे वगळण्यासाठी 16 हजार 500 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या सहायक संचालक शरद जाधव, सहायक लेखा अधिकारी सिद्धार्थ शेट्ये आणि कंत्राटी शिपाई सतेज घवाळी या तिघांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली.
लेखा परीक्षण अहवालातील 21 मुद्दे वगळून अंतिम अहवाल देण्यासाठी जाधवच्या वतीने घवाळीने तक्रारदाराकडे 24 हजारांच्या लाचेची मागणी केली होती. या विरोधात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यांनी गुरुवारी सायंकाळी स्थानिक निधी लेखा परीक्षण कार्यालयात सापळा रचून तडजोडीअंती तक्रारदाराकडून 16, 500 रुपये घेताना रंगेहाथ पकडले होते.

