Ratnagiri Accident : आयशर टेम्पोची दुचाकीला धडक; शिक्षक गंभीर जखमी

सावर्डे डेरवण फाटा येथे घडला अपघात
Ratnagiri Accident News
आयशर टेम्पोची दुचाकीला धडक; शिक्षक गंभीर जखमी
Published on
Updated on

चिपळूण : तालुक्यातील सावर्डे डेरवण फाटा येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सायंकाळी झालेल्‍या भीषण अपघातात आयशर टेम्पोने होंडा ॲक्टिव्हा दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार शिक्षक गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डेरवण फाटा येथे रविवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आयशर टेम्पोने होंडा ॲक्टिव्हाला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकी टेम्पोच्या पुढील चाकाखाली अडकली. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. यामध्ये शंकर पाटील (रा. सावर्डा भुवडवाडी) हे प्राथमिक शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि सावर्डे पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी दुचाकीस्वाराला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news