Nitesh Rane| दाभोळ खाडीतील मत्स्यव्यवसायाच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करा

सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाईचे मंत्री नितेश राणेंचे निर्देश
Nitesh Rane
Nitesh Rane pudhari photo
Published on
Updated on

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ खाडी परिसरातील मच्छीमारांच्या विविध समस्या तसेच औद्योगिक वसाहतीतून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे मत्स्यव्यवसायाचे नुकसान होत आहे. मच्छीमार बांधवांचे नुकसान टाळण्यासाठी यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांनी आज दिले.

दाभोळ खाडी परिसरात लोटे औद्योगिक वसाहतीमधून येणाऱ्या प्रदूषित सांडपाण्यामुळे मासेमारीवर परिणाम होत असल्याच्या मुद्यावर मंत्रालयात आयोजित या बैठकीस माजी आमदार सूर्यकांत दळवी, मत्स्यआयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री नितेश राणे म्हणाले, दाभोळ खाडी परिसरात गुहागर तालुक्यातील अंजनवेल ते खेड तालुक्यातील कर्जी ते चिपळूण तालुक्यातील गोवळकोटपर्यंतचा भाग येत असून, या परिसरात ५२ मच्छीमार गावे आणि सुमारे १४ हजार ९८८ मच्छीमार लोकसंख्या आहे. औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्यांतून निघणारे सांडपाणी दाभोळ खाडीत सोडले जात असल्याने मासे मृत होण्याच्या घटना घडत आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने आवश्यक कार्यवाही करावी, तसेच मच्छीमारांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मंत्री राणे यांनी दिले.

मच्छीमारांचे हित जपणे ही शासनाची प्राथमिकता आहे. त्यामुळे दाभोळ खाडीच्या प्रदूषणामुळे मासेमारी कोणत्याही परिस्थितीत प्रभावीत होवू याबाबत सर्व यंत्रणानी दक्षता घ्यावी. जे उद्योग प्रक्रिया न करताच दूषित पाणी खाडीत सोडतात त्यांच्यावर प्रभावी कारवाई करावी. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पामध्ये उद्योगाकडून येणारे पाणी आणि प्रक्रिया केल्यानंतर सोडले जाणारे पाणी या दोन्हीची गुणवत्ता तपासावी असे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिले.

दरम्यान, दाभोळ खाडीच्या मुखाशी गाळ काढण्याच्या कामाबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आले. या कामासाठी राज्यस्तरीय सॅनिटरी समितीची मान्यता घेऊन प्रस्ताव सादर करण्यात आला असून, केंद्र शासनाकडूनही प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळामार्फत निविदा प्रक्रिया राबवून हे काम प्राधान्याने पूर्ण केले जावे, असे निर्देश यावेळी मत्स्यद्योग मंत्री नितेश राणे यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news