LED Fishing| एलईडी मासेमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई करा!

जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या मत्स्य विभागाला सक्त सूचना; शून्य सहनशीलतेचे निर्देश
LED Fishing
LED Fishing
Published on: 
Updated on: 

रत्नागिरी : बेकायदेशीर एलईडी प्रकाशातील मासेमारीविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सक्त सूचना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी मत्स्य विभागाला दिल्या आहेत. एलईडी मासेमारीबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त जे. डी. सावंत आणि संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईत शून्य सहनशीलता ठेवण्याचे निर्देश दिले.

दापोली तालुक्यातील हर्णे जेटीच्या रखडलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे सचिव राजेश अगरवाल यांनी शुक्रवारी जेटीच्या कामाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, महाराष्ट्र सागरी मंडळाचे अभियंते, सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त जे. डी. सावंत आणि परवाना अधिकारी चिन्मय जोशी उपस्थित होते. याच दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी एलईडी मासेमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

रत्नागिरी जिल्ह्याला १६७ किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस एलईडी दिव्यांच्या प्रकाशातील मासेमारीला वेग येत असल्याने या प्रकारावर नियंत्रण ठेवण्याची मागणी होत आहे. दरम्यान, हर्णे जेटीचे सुमारे १५३ कोटी रुपयांचे काम सीआरझेड परवानगीच्या अडथळ्यामुळे गेल्या वर्षभरापासून संथगतीने सुरू आहे. या कामाचा आढावा घेतल्यानंतर सचिवांनी प्रांताधिकारी आणि तहसीलदार कार्यालयांनाही भेटी दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news