Swachh Survekshan 2025 | चिपळूण नगर परिषद कोकणात अव्वल

Cleanliness Ranking | स्वच्छ सर्वेक्षण राज्यात 14 वे, तर देशात 87 वे मानांकन
Swachh Survekshan 2025
चिपळूण नगर परिषद(Pudhari File Photo)
Published on
Updated on

चिपळूण : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत नुकत्याच जाहीर झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये चिपळूण नगर परिषद ने लक्षणीय यश संपादन केले असून महाराष्ट्रात 14 वा, तर कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. देशपातळीवर एकूण 4589 नगर पंचायती, नगर परिषद व महापालिका संस्थांनी सहभाग घेतलेल्या या सर्वेक्षणात 50 हजार ते 3 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात चिपळूण शहराला देशात 87 वे स्थान मिळाले आहे.

चिपळूण नगर परिषदेमार्फत शहरात दररोज निर्माण होणार्‍या कचर्‍याचे 100 टक्के संकलन, ओला-सुका व घरगुती घातक कचर्‍याचे वर्गीकरण, त्यावर प्रक्रिया, मैला संकलन व त्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन, सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची नियमित स्वच्छता, तसेच शहर सफाई यासाठी सातत्यपूर्ण काम केले जात आहे. याशिवाय, नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या त्रयस्त संस्थेमार्फत शहराचा आढावा घेण्यात आला होता. त्यामध्ये प्रत्यक्ष पाहणीबरोबरच नागरिकांकडून प्रतिक्रिया घेण्यात आल्या.

Swachh Survekshan 2025
Chiplun News | चिपळूण गटशिक्षणाधिकारीपदी शेंडगे

या मूल्यांकनाच्या आधारे चिपळूण शहरास ‘कचरा मुक्त शहर’ मानांकनात एक स्टार, तसेच ‘हागणदारी मुक्त शहर’ (जऊऋ++) असे दुहेरी गौरव प्राप्त झाले आहेत. नागरिकांचा मिळालेला सकारात्मक प्रतिसाद आणि सहकार्य यामुळेच हे यश शक्य झाले, असे प्रशासनाने सांगितले. स्वच्छ सर्वेक्षणाच्या यशस्वितेमागे चिपळूण नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले यांचे प्रभावी नेतृत्व लाभले असून त्यांच्यासह प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालय अधीक्षक रोहित खाडे, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते आदींसह सर्व कर्मचार्‍यांचे योगदान मोलाचे ठरले.

Swachh Survekshan 2025
Ratnagiri : वीजप्रश्नांवर आ. राणे, आ. निकम आक्रमक

चिपळूणकर नागरिकांची सहकार्यभावना, नगर परिषद कर्मचार्‍यांची तळमळ आणि एकूणच शहराच्या स्वच्छतेविषयी असलेली सजगता यामुळेच हे यश शक्य झाल्याचे चित्र दिसून आले आहे. स्वच्छतेच्या दिशेने चिपळूणचा प्रवास प्रेरणादायी ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news