

कोकणातील शिमगा उत्सवात अनेक रूढी व परंपरा पहायला मिळतात. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडच्या शिमगोत्सवात मढं काढण्याची परंपरा आहे. अरिष्टाचे प्रेत तयार करून हुताशनी पौर्णिमेला संपूर्ण शहरातून प्रेतयात्रा काढली जाते. अनेक वर्षे ही परंपरा जोपासली जात आहे. (Shimga festival in Konkan)
हुताशनी पौर्णिमेच्या रात्री होम पेटवल्यानंतर ही परंपरा जोपासत खेडमध्ये मढं काढण्यात आलं. ईडा पीडा टळावी अशी प्रार्थना या माध्यमातून देवी श्री पाथरजाई देवीला करून होमामध्ये प्रतिकात्मक प्रेताचे दहन करत भक्तांनी केली.
खेड शहरातील देवी पाथरजाई देवीच्या शिमगोत्सवात होम लागला की, खेड शहरातील हनुमान मित्र मंडळ व परिसरातील सर्व तरुणवर्ग एकत्र येऊन मड काढतात. मड म्हणजे प्रेतयात्रा. खेड शहरातील शिमग्यातील ही प्रेतयात्रा पहायला अगदी पुणे, मुंबईहून चाकरमानी मोठ्या हौसेने येतात. 'आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा' असे म्हणत हे मढं काढण्यात येते. खेड शहरातून प्रेतयात्रा काढली जाते. काही लोक हो प्रेत रस्त्यात ठेवून खूप जोरजोराने प्रेताजवळ रडताना आढळतात. आलेले किंवा येणारे अनिष्ठ दूर व्हावे यासाठी हे मढं काढलं जातं.
खेड शहरावर अनिष्ठ येऊ नये, ईडा पीडा टळावी, त्याचा बंदोबस्त व्हावा. गेल्या १०० वर्षांहून अधिक काळ ही परंपरा जोपासली जात आहे. हे मड म्हणजे प्रेतयात्रा खेड शहरातून संपूर्ण फिरवल्यानंतर ज्या ठिकाणी देवी पाथरजाई देवीचा होम लागतो त्या होमामध्ये मढं दहन केलं जातं.
१०० वर्षा आधी पासून पूर्वज शहराची दृष्ट काढण्यासाठी ही प्रथा होळीच्या दिवशी करायची. ती प्रथा आजही सुरू आहे. हुताशनीची प्रेत यात्रा असेही संबोधले जाते. अनेक वर्षे पिढयानपिढ्या ही आगळी 'वेगळी प्रथा आहे. शहरात आलेली नवीन व्यक्ती मध्यरात्री वाजत गाजत निघालेली ही प्रेत यात्रा पाहून घाबरतात. मात्र या प्रथेची माहिती मिळाल्यानंतर त्यांना देखील कुतूहल वाटते.