

रत्नागिरी : रत्नागिरीजवळील कारवांचीवाडी-पारसनगर येथे 8 महिन्यांच्या मुलीची आईनेच हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सतत रडत असल्याने आईने मुलीच्या तोंडात बोळा कोंबून तिची हत्या केली आहे.
कारवांचीवाडी-पारसनगर येथे राहणाऱ्या शाहीन असिफ नाईक (36) या महिलेने तिच्या आठ महिन्याच्या मुलीची हत्या केली. मुलगी सतत रडत होती आणि याच कारणावरून तिने बुधवारी संध्याकाळी मुलीच्या तोंडात बोळा कोंबून तिचा जीव घेतल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. हुरेन आसीफ नाईक (8 महिने ) असे मयत मुलीचे नाव आहे. याबाबत ग्रामीण पोलीसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले असून संशयित आईला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.