Robbery Case : सिंधुदुर्ग समुद्रात नौकावर दरोडा

रत्नागिरीतील नाैकांवरील मासळी सिंधुदुर्गतील नाैकाकडून हिसकावून घेतली
Robbery Case
सिंधुदुर्ग समुद्रात नौकावर दरोडा
Published on
Updated on

रत्नागिरी : रत्नागिरीच्या समुद्रात मासळी मिळत नसल्याने रत्नागिरीतील अनेक पर्ससीन नेट नौका सिंधुदुर्गच्या समुद्रात मासेमारीसाठी जातात. अशा नौकांमधील मासळी सिंधुदुर्गतील काही नौकांकडून घेराव घालून जबरदस्तीने हिसकावून घेतली जाते. काही वेळेला रत्नागिरीतील नौकांमधील तांडेल खलाशांना मारहाणही झाली आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी तालुका पर्ससीन नेट मालक असोसिएशन आणि रत्नागिरी जिल्हा पर्ससीन नेट संघटनांची तातडीची बैठक झाली. यामध्ये जबरदस्तीने मासळी लुबाडणाऱ्यांना सनदशीर प्रतिकार आणि पोलिसांकडे तक्रार करण्याबाबतचा निर्णय झाला आहे.

रत्नागिरीत पर्ससीन नेट मासेमारी करणाऱ्या नौकांच्या सुरक्षिततेसाठी तालुका आणि जिल्हा पर्ससीन नेट संघटना आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून रत्नागिरीच्या समुद्रात मासळी मिळत नसल्याने बहुसंख्य पर्ससीन नेट नौका मालक आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे रत्नागिरीतील काही पर्ससीन नेट नौका सिंधुदुर्गच्या समुद्रात मासेमारी करण्यासाठी जातात. त्याचबरोबर काही पर्ससीन नेट नौका साडेबारा नॉटीकल मैल बाहेर मासेमारी करून मासळी न मिळाल्याने परतताना सिंधुदुर्गच्या समुद्रात जाळी टाकतात.

रत्नागिरीच्या नौका सिंधुदुर्ग समुद्रात आल्याचे कळताच तेथील काही नौका घोळक्याने येऊन त्या पर्ससीन नेट नौकेतील मासळी लुटतात. समुद्रात टाकलेली जाळी वर खेचून त्यातील मासळीही काढून घेतात. ही लुटालुट सुरू असताना अनेक वेळा मारहाणही केली जाते, अशा तक्रारी रत्नागिरीतील दोन्ही संघटनांकडे आल्यानंतर शुक्रवारी याबाबत तातडीची बैठक झाली. यापुढे अशा घटना घडल्या तर त्या नौकांचे तांडेल आणि खलाशांनी सनदशीर प्रतिकार करावा, त्याचबरोबर मासळी लुटल्याबाबत तेथील पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे निर्णय संघटनांचे सदस्य असलेल्या नौका मालकांना कळण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news