Niramay Hospital : निरामय रुग्णालय लवकरच सुरू

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार बंद रुग्‍णालयाची केली पाहणी : आमदार प्रमोद जठार
MLA Pramod Jathar
आमदार प्रमोद जठार
Published on
Updated on

गुहागर : तालुक्यातील रानवी येथील बंद अवस्थेतील निरामय रुग्णालयाची आमदार प्रमोद जठार यांनी मंगळवारी पाहणी केली. लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या निरामय हॉस्पिटलचे उद्‍घाटन होईल, असे संकेत आ. जठार यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसारच ही पाहणी केल्याचे त्यां‍नी सांगितले.

विधान परिषदेचे भाजपचे आमदार प्रमोद जठार यांनी मंगळवारी गुहागर तालुक्यातील रानवी येथील बहुचर्चित व बंद अवस्थेत असलेल्या निरामय रुग्णालयाची पाहणी केली. आज येथील जनतेला या रुग्णालयाची नितांत गरज आहे. निरामय पुन्हा सुरू व्हावे, अशी आपणा सर्वांची तसेच आपल्याबरोबर असलेले सर्व भाजपचे पदाधिकारी, माजी आमदार डॉ. विनय नातू यांची इच्छा आहे. यामुळे त्यांच्या स्वप्नांना नक्कीच दिशा मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने व प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड यांनी सांगितल्याप्रमाणे आज आपण या निरामय रुग्णालयाची पाहणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news