Sindhudurg : हत्तींच्या धुडगुसात शाळेवर कोसळला भेडले माड!

दोडामार्ग-घोटगे गावातील घटना; छप्पर, इमारत, संगणक, लॅपटॉप आदी साहित्यांचे नुकसान
Sindhudurg elephant rampage
हत्तींच्या धुडगुसात शाळेवर कोसळला भेडले माड!
Published on
Updated on

दोडामार्ग ः घोटगे परिसरात गेल्या काही दिवसांपासून वावरणार्‍या हत्तींकडून नुकसान सुरूच आहे. या हत्तींनी गावातील प्राथमिक शाळा नं. 1 लगत असलेले भेडला माडाचे झाड मोडल्याने ते थेट शाळेवर कोसळले. यात शाळेच्या इमारतीसह आतील साहित्यांचे मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. नुकसान झालेले साहित्य तत्काळ उपलब्ध करून द्यावे व शाळेची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी वन अधिकार्‍यांकडे केली.

पाच हत्तींचा एक कळप मागील काही दिवसांपासून घोटगे परिसरात वावरत आहे. हा कळप गावातील शेती व फळबागायतींमध्ये धुडगूस घालत आहे. हत्तींचा कळप दिवसाढवळ्या लोकवस्तीत वावरत आहे. गुरुवारी रात्री 2 वा. च्या सुमारास हा कळप घोटगे येथील जिल्हा परिषद शाळेजवळ होता. या हत्तींनी शाळेच्या इमारती लगत असलेला भेडले (भिल्ला) माड मोडून टाकला. दुर्दैवाने हा माड थेट शाळेवर कोसळला. यात शाळेचे छप्पर, भिंत व आतील संगणक, लॅपटॉप व इतर साहित्याची मोडतोड झाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी शाळेकडे धाव घेतली. वनविभागालाही याची कल्पना दिली. मात्र अधिकारी उशिरा आल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. हत्तींच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभाग व प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन हत्तीचा वावर असलेल्या भागात आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news