Konkan Shimgoatsav : श्री महालक्ष्मी साळूबाईचा उद्यापासून शिमगोत्सव

मिरजोळीत जय्यत तयारी; विविध कार्यक्रमांचे आयोजन, आरत्या व नवस घेणार
Konkan Shimgoatsav
श्री महालक्ष्मी साळूबाईचा उद्यापासून शिमगोत्सव
Published on
Updated on

चिपळूण : मिरजोळी येथील ग्रामदेवता श्री देवी महालक्ष्मी-साळूबाईच्या शिमगोत्सवाला 3 मार्चपासून प्रारंभ होणार आहे. त्याची जय्यत तयारी गावात करण्यात आली असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

2 मार्च रोजी रात्री 10 वाजता श्री देवी महालक्ष्मी साळूबाई मंदिर परिसरातील सहाणेवर पालखी सजवली जाणार. 3 रोजी पहाटे 5 वाजता मंदिराजवळ भद्री होम झाल्यावर मंदिरापासून पवारवाडीपर्यंत मिरवणुकीने पालखीचे आगमन होणार आहे. त्यानंतर प्रथम तीन मानकरी घरातील आरत्या घेतल्यावर मिरवणुकीने पालखी दलवाई मोहल्ला मार्गे कोंढे सीमेवर जाताना त्या परिसरातील आरत्या घेणार आहे. त्यानंतर चौथ्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या मानकरी घरातील आरती घेत दत्तवाडी येथे आगमन व येथील श्री दत्त मंदिर स्टेजवर बसून ग्रामस्थ व भाविकांच्या आरत्या घेतल्या जातील

4 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून भोरजेवाडी, ब्राम्हणवाडी मार्गे खोरीवाडी, वरची पवारवाडी, खालची पवारवाडी, त्यानंतर रोहिदास वाडी येथे आरत्या घेऊन पालखीचे उक्ताडकडे प्रयाण होणार आहे. 5 रोजी कानसेवाडी, भोसले यांच्या घरी बसून त्यानंतर बडदेवाडी, कांगणेवाडी, गणपती मंदिर येथे स्टेजवर बसून येथील आरत्या घेतल्या जातील. 6 रोजी कांगणेवाडीनंतर पेटकर, गोंजारे चाळ येथील आरत्या घेऊन कोलेखाजन, चिपळूणकरवाडी येथील सहाणेवर बसून आरत्या, त्यानंतर होळीच्या शेतात स्टेजवर बसून या विभागातील आरत्या, महालक्ष्मी नगर येथील गोडेबाबा आंब्याजवळ बसून या विभागातील आरत्या व नवस घेतले जाणार आहेत.

7 रोजी महालक्ष्मी रेसिडेन्सी येथील आरत्या व नवस, त्यानंतर जाखमाता मंदिराजवळ आगमन व विभागातील आरत्या, रात्री 11 नंतर जाखमाता मंदिर, गणपती मंदिर ते मारुती मंदिर चौकीपर्यंत भाविकांच्या आरत्या व नवस घेत बाजार शिमग्याला प्रारंभ होणार आहे. 8 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून मारुती मंदिर, संसारे नाका, खंड भाटिया गॅरेज ते खंड चौकी, गणपती मंदिर मार्गे सरळ रस्त्याने जुना गुहागरनाक्यापर्यंत आरत्या व नवस, उक्ताड येथील खेराडे यांच्या अंगणात बसून या विभागातील आरत्या घेऊन . मिरवणुकीने मिरजोळी येथील श्री देवी महालक्ष्मी साळूबाई मंदिरात आगमन होऊन रात्री 12 नंतर मंदिर परिसरातील सहाणेवर ललिताने शिमगोत्सवाची सांगता होणार असल्याचे ट्रस्ट कमिटीने कळवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news