

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
कोकणातील दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना आमदार योगेश कदम यांनी त्यांचा गड राखला आहे. राष्ट्रवादीतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आलेले संजय कदम यांचा त्यांनी पराभव केला आहे. योगेश कदम यांनी पहिल्या फेरी पासून घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवली.
योगेश कदम यांच्या विजयात महिला व युवा मतदारांचा कौल महत्वाचा ठरल्याचे म्हंटले जाते. शिवसेना कार्यकर्त्यांनी खेड, दापोली व मंडणगड मध्ये योगेश कदम यांना स्पष्ट बहुमत दिले असून, कोकणात शिवसेना शिंदेंची हे पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे म्हंटले जात आहे.