

दापोली : दापोली तालुक्यातील अडखळ जुईकर मोहल्यात दि 26 रोजी समुद्राच्या उधाणाचे पाणी शिरल्याने राहत्या घरांना धोका निर्माण झाला आहे. या उधाणाच्या पाण्याच्या प्रवाहात खाडी किनारी असणार्या बोटींचे अवशेष वाहून आले आहेत.
याबाबत येथील मंडळ अधिकारी,तलाठी यांनी पंचनामा करून वस्तुस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.खाडी किनारी असणार्या सुमारे आकराशे मीटर लांबीच्या क्षेत्रात हे पाणी शिरले आहे.या पाण्यामुळे घरांच्या शेजारी असणार्या संरक्षण भिंतींचे आणि घराच्या भिंतींचे मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.या ठिकाणी संरक्षण भिंत हवी अशी मागणी या आधी येथील ग्रामस्थांची होती.मात्र या कडे दुर्लक्ष झाले होते.मात्र उधाणाचे पाणी मोहल्यात शिरल्याने पुन्हा एकदा संरक्षण भिंतीची मागणी जोर धरू लागली आहे.