

खेड : माजी आमदार संजय कदम यांची हकालपट्टी पक्षाने केली आहे, अशी माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख दत्ताराम भिलारे यांनी शुक्रवारी 7 रोजी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पदाधिकारी, युवा सेना व महिला आघाडी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय कदम यांच्याबाबत ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यातच शुक्रवारी 7 रोजी सायंकाळी संजय कदम यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. या पार्श्वभूमीवर खेड उबाठा शिवसेना पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय कदम यांच्यावर टीका केली.
यावेळी उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख दत्ताराम भिलारे, युवा सेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे, महिला आघाडी अंकिता बेलोसे, बाळा खेडेकर, शहरप्रमुख शेखर पाटणे, अंकुश कदम, ज्ञानदेव निकम, अरविंद तोडकरी, मनोज भोसले, राकेश सागवेकर, हरभजन दांडेकर, प्रसाद पाटणे, चेतन वारणकर, प्रशांत खातू, मंदार शिर्के आदी उपस्थित होते. यावेळी तालुका प्रमुख भिलारे म्हणाले, संजय कदम यांची पक्षाने हकालपट्टी केली आहे. याबाबतचे पत्र पक्षाचे सचिव नेते विनायक राऊत यांनी जाहीर केले आहे. आम्ही पक्षासोबत आहोत.
येत्या सर्व निवडणुका संजय कदम यांच्याविरोधात लढवल्या जातील. संजय कदम याने पक्षाशी दुसर्यांदा गद्दारी केली आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत कोणीही शिवसैनिक जाणार नाही, असेही भिलारे म्हणाले.