संगमेश्वर हादरले! पुण्यात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर नराधमाचा अत्याचार; आरोपी जेरबंद

पीडितेने संगमेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेताच, पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली
minor girl assault case
minor girl assault casepudhari
Published on
Updated on

देवरुख : कोकणातील शांतता आणि विश्वासाला तडा देणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. शिक्षणासाठी पुण्यासारख्या शहरात गेलेल्या संगमेश्वरच्या एका अल्पवयीन मुलीला ओळखीच्याच तरुणाने आपल्या वासनेची शिकार बनवले. कौटुंबिक ओळखीचा फायदा घेत आणि घरच्यांना ठार मारण्याची धमकी देऊन केलेल्या या कृत्यामुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान सदर आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले आहे.

पीडित मुलगी भविष्यातील स्वप्ने उराशी बाळगून हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करण्यासाठी पुण्यात भावाकडे राहत होती. मात्र, १७ एप्रिलच्या सकाळी आरोपी युसूफ मोहमद सय्यद (रा. आंबेड खुर्द) हा आपल्या निळ्या रंगाच्या कारमधून तिच्या दारात पोहोचला. "तुझ्या घरच्यांना त्रास होईल," अशी क्रूर धमकी देऊन त्याने तिला गाडीत बसवले आणि एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्या असहाय्यतेचा फायदा घेतला. नराधमाची विकृती एवढ्यावरच थांबली नाही, तर दुसऱ्या दिवशीही त्याने पुन्हा तिला दुसऱ्या हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार केला.

पीडितेने संगमेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेताच, पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली. भारतीय न्याय संहिता (BNS) आणि 'पोक्सो' (POCSO) सारख्या अत्यंत कडक कायद्यांनुसार गुन्हा नोंदवून संगमेश्वर पोलिसांनी आरोपीचा माग काढला. आपल्या हद्दीत आरोपी सापडताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

हा गुन्हा पुण्यातील खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याने, तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून आरोपी युसूफ सय्यदला खडक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ओळखीचा बुरखा ओढून अल्पवयीन मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news