

रत्नागिरी : मंंत्रिमंडळ विस्तारानंतर गेल्या बर्याच दिवसांपासून पालकमंत्रिपदाची निवड लांबणीवर पडली होती. त्यामुळे पालकमंत्री पदाची निवड कधी होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. बर्याच जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या नेमणुकीअभावी विकासात्मक कामे खोळंबली होती. या पार्श्वभूमीवर राज्यातील पालकमंत्र्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी मंत्री उदय सामंत यांची तर सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून आमदार नितेश राणे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीची यादी शनिवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. पालकमंत्री निवडीची घोषणा करण्यात आली असून अन्य जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या नावाचा देखील यात समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी मंत्री उदय सामंत यांची निवड केली आहे तर सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून आमदार नितेश राणे यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.