आरपीआयला विधानसभा निवडणुकीसाठी 10 ते 12 जागा हव्यात : ना. आठवले

आम्ही महायुतीचे घटकपक्ष; भाजपच्या कोट्यातून जागा नको
Ramdas Athawale statement
रामदास आठवले
Published on
Updated on

रत्नागिरी : भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीमधील आरपीआय हा महत्त्वाचा घटक पक्ष असून आगामी विधानसभेला आम्हाला भाजपच्या कोट्यातून नव्हे तर घटक पक्ष म्हणून किमान 10 ते 12 जागामिळायला हव्यात, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री तथा आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

Ramdas Athawale statement
रत्नागिरी : आजपासून जिल्ह्यात ‘स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता’

शिवसेना - भाजपची युती टिकण्यासाठी प्रत्येकी अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव मी भाजपला दिला होता. माझा प्रस्ताव मान्य केला असता तर हे सर्व घडलंच नसते असेही ना. आठवले यांनी यावेळी सांगितले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आम्हाला काही प्रमाणात अपयश मिळाले. विरोधकांनी ब्लॅकमेल करत सोशल मीडियात अफवा पसरवल्याने आम्हाला हा फटका मिळाला. पण मोदींनी मोठ़्या प्रमाणावर विकास केलेला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद हा 90 टक्क्यांपर्यंत संपविण्यात आलेला असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे भाजपसोबत हवे होते : ना. आठवले

शिवसेना-भाजपची युती टिकण्यासाठी प्रत्येकी अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव मी भाजपला दिला होता. माझा प्रस्ताव मान्य केला असता तर हे सर्व घडलंच नसतं, असेही देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व भाजप सोबत असायला हवे होते. त्यामुळे परिस्थिती वेगळी राहिली असती, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Ramdas Athawale statement
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्ग वाहनांनी फुलला!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news