Ratnagiri News : जि. प.चे ५७ विद्यार्थी करणार इस्‍त्रो अभ्यास दौरा

१९ ते २३ मे दरम्‍यान दौरा; काळजी घेणारे ११ जि. प. अधिकारी, शिक्षक सोबत असणार
Ratnagiri Zilla Parishad
Ratnagiri Zilla Parishad
Published on
Updated on

रत्नागिरीः इस्‍त्रो अभ्यास दौर्‍यासाठी जिल्‍हा परिषदेच्‍या प्राथमिक विभागाच्‍या वतीने इयत्ता सातवीच्‍या विद्यार्थी-विद्याथिनींची परीक्षा घेण्यात आली होती. त्‍यापैकी मेरीटमध्ये आलेल्‍या ५७ विद्यार्थ्यांची भारतीय अवकाश संशोधन संस्‍थेच्‍या अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. येत्‍या १९ मे २३ मे दरम्‍यान ५७ विद्यार्थी, ११ काळजीवाहू अधिकारी,शिक्षक इस्‍त्रोला १९ मे रोजी पहाटे पाच वाजता जिल्‍हा परिषद येथून रवाना होणार आहेत.

विद्यार्थ्यांच्‍या ज्ञानात भर पडावी तसेच लहानपणापासूनच त्‍यांना वैज्ञानिक बनवण्यासाठी प्रोत्‍साहन मिळावे म्‍हणून जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने व पालकमंत्री उदय सामंत यांच्‍या संकल्‍पनेतून दरवर्षी इस्‍त्रो अभ्यास दौरा आयोजित करण्यात येतो. यापूर्वी दोनवेळा हा दौरा झाला आहे. पालकमंत्री सामंत हे दरवर्षी जिल्‍हा वार्षिक निधीतून ४० लाखांचा निधी या अभ्यास दौऱ्यासाठी देतात. दरम्‍यान, यंदाच्‍या वर्षीही जिल्‍हा परिषदेच्‍या प्राथमिक शाळातील सातवीत शिकणाऱ्या हजारो विद्यार्थी-विद्यार्थिंनींची परीक्षा घेण्यात आली. पहिल्‍यांदा तालुकास्‍तरावर त्‍यानंतर जिल्‍हा स्‍तरावर परीक्षा झाली. मेरीटमध्ये आलेल्‍या विद्यार्थ्यांची इस्‍त्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे.

जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अध्यक्ष अस्‍मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनिता शिरभाते, माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाने यांच्‍या मार्गदर्शनाखाली हा इस्‍त्रो दौरा करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news