मासेमारीसाठी गेलेल्या तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यूfile photo
रत्नागिरी
Ratnagiri : मासेमारीसाठी गेलेल्या तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू
उंडी समुद्रकिनाऱ्यावरील घटना
रत्नागिरी ः तालुक्यातील उंडी समुद्रकिनारी मासेमारी करण्यासाठी गेलेल्या प्रौढाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवार 14 जुलै रोजी सकाळी 8.20 वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली.
अरुण गणपत गावणकर (56, रा. उंडी, रत्नागिरी) असे बुडून मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. ते सोमवारी सकाळी उंडी येथील समुद्रकिनारी मासेमारी करीत होते. त्यावेळी समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. ते उंडी समुद्रकिनारी वानाजवळ खडकाळ भागात आढळून आले असता त्यांना उपचारांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद-खंडाळा येथे दाखल करण्यात आले होते. तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

