

गुहागर : गुहागर भंडारी भवन येथे तहसीलदार परीक्षित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील एकूण 66 ग्रामपंचायतीची सरपंच आरक्षण सोडत सोमवारी (दि. 14) काढण्यात आली. तालुक्यातील 33 ग्रामपंचायतींवर महिलाराज येणार असून, तालुक्यात एक जिल्हा परिषद गट वाढला आहे.
यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्ग महिला- शिवणे, अनुसूचित जाती जांभरी, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला - शीर, मासू, पाचेरीसडा, भातगाव , साखरी त्रिशूळ, मुंढर, कारूळ, विसापूर, मळण. नागरिकांचा मागास प्रवर्ग- पाचेरीआगर, रानवी, गोळेवाडी, आंबेरे खुर्द ,कोतळूक, वडद, परचुरी, असगोली, काजुर्ली. सर्वसाधारण प्रवर्ग- आबलोली, जानवळे, चिंद्रावळे, पेवे, काताळे, साखरीआगर, पांगरी तर्फे वेळंब, वेळंब, अडूर, अंजनवेल, वेलदूर, कोसबीवाडी, तळवली, निगुंडळ, पालपेणे, गिमवी, हेदवी? ? कौंडरकाळसूर, मडाळ, चिखली, पोमेंडी, कुटगिरी, साखरी बुद्रुक.
सर्वसाधारण महिला प्रवर्गात पिंपर, आवरे -असोरे, पाटपन्हाळे, सुरळ, उमराट, पडवे, पालकोट त्रिशूल, झोंबडी, वरवेली, कोळवली, पालशेत, खोडदे, वेळणेश्वर, पाली, पाभरे, खामशेत, पांगरी तर्फे हवेली, जामसूर, कुडली, नरवण, धोपावे, आरे, कोंडकरूळ? ? या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सोमवार, दि. 14 जुलै रोजी राज्य शासनाकडून जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची प्रारूप प्रभाग रचनाही जाहीर करण्यात आली. जाहीर केलेल्या जिल्हा परिषदेच्या प्रारुप गटात एकने वाढ झाली आहे. गुहागर तालुक्यात असगोली, शृंगारतळी, कोंडकरूळ, वेळणेश्वर व पडवे असे जिल्हा परिषद गट असणार आहेत तर पंचायत समिती गण अंजनवेल, असगोली, तळवली, शृंगारतळी, मळण, कोंडकरूळ, शीर, पडवे, पाचेरी सडा व वेळणेश्वर असणार आहेत.