Ratnagiri News : जिल्‍ह्यात पावसाची उसंत; पुन्‍हा उष्मा वाढला!

सलग तीन दिवस जिल्‍ह्यात पावसाची दमदार बॅटिंग, २२८ मि.मी. पाऊस
Ratnagiri News
जिल्‍ह्यात पावसाची उसंत; पुन्‍हा उष्मा वाढला!
Published on
Updated on

रत्‍नागिरी : जिल्‍ह्यात मान्‍सूनच्‍या पावसाने जोरदार एन्‍ट्री केली असून सलग तिसऱ्या दिवशीही पावसाने दमदार बॅटींग केली आहे. मात्र बुधवारी सकाळी 11 वाजल्‍यापासून पावसाने उसंत घेतल्‍याने पुन्‍हा उष्मा कमालीचा वाढला आहे. घामाने रत्‍नागिरीकर चांगलेच हैराण झाले आहेत.

मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळपर्यंत २२८.२७ मि. मी. पाऊस झाला आहे. त्‍यापैकी सर्वाधिक पाऊस रत्‍नागिरी ७० मि. मी., गुहागर ६० मि.मी. आणि संगमेश्वरात ३० मि.मी. पाऊस चांगलाच बरसला आहे. सर्वात कमी मंडणगड, खेड तालुक्‍यात झाला आहे. दरम्‍यान, पावसामुळे नागरिकांना उष्मापासून दिलासा मिळाला होता. रविवारी रत्‍नागिरी, राजापूर तसेच सोमवारी तीन ते चार तालुक्‍यात, आता सर्वदूर पावसाने दमदाट बॅटींग केली असून तब्‍बल 228 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्‍ह्याला 11 जूनपर्यंत यलो अलर्ट जारी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news