Ratnagiri Rain update : जिल्‍ह्याला आज, उद्या यलो अलर्ट!

जगबुडी नदी धोक्यावरून इशारा पातळीवर; २४ तासांत ५७५ मि.मी. पावसाची नोंद
Ratnagiri Rain Updates
Ratnagiri Rain Updates
Published on
Updated on

रत्‍नागिरी : रत्‍नागिरी जिल्‍ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. मागील चोवीस तासांत तब्‍बल ५७५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी पावसाने विश्रांती घेतली असून, काही ठिकाणी संततधार पावसाने हजेरी लावली. दरम्‍यान, बुधवार व गुरुवारी जिल्‍ह्याला यलो अलर्ट जारी केला आहे, तर १० जुलैपासून जिल्‍ह्याला ग्रीन अलर्ट आहे.

दापोली, खेड आणि चिपळूणमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. दुकानात, घरात पाणी साचले होते. एकंदरीत सोमवार, मंगळवारी पावसाचा जोर कमी झालेला आहे. त्‍यामुळे पूर स्‍थिती कमी झालेली आहे. १ जून ते ७ जुलैपर्यंत सरासरी १ हजार १७६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. चोवीस तासांत सर्वाधिक पाऊस खेड तालुक्‍यात १०८.८५ मिमी, चिपळूण १०० मिमी, मंडणगड ९० मिमी, दापोली ७१.७१ मिमी, गुहागर ३९.२०, संगमेश्वर ६४.१६, रत्‍नागिरी २१.२२, लांजा ४४.४०, राजापूर ३४.८८ असा एकूण ५७५ मिमी पाऊस झाला आहे.

८ जुलै रोजी रत्‍नागिरी, पालघर, नाशिक घाट, रायगड, कोल्‍हापूर घाट, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा व ९ जुलै रोजी रत्‍नागिरी, सातारा घाट, पुणे घाट, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, तर १०, ११ जुलैला रत्‍नागिरी जिल्‍ह्याला ग्रीन अलर्ट जारी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news