Ratnagiri Water Supply| चिपळुणात सोमवारी पाणीपुरवठा बंद

खेर्डी जलशुद्धीकरण केंद्रात पाईपलाईन दुरुस्ती
water supply issue
Water SupplyPudhari
Published on: 
Updated on: 

चिपळूण शहर : चिपळूण नगर परिषदेच्या वतीने खेर्डीमधील जलशुद्धीकरण केंद्रात सोमवार दि. १६ नोव्हेंबर रोजी पाईपलाईनचे काम करण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण शहरातील दुपार आणि संध्याकाळच्या सत्रातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून व काटकसरीने करावा, असे आवाहन नगर परिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नगर परिषदेने दिलेल्या जाहीर सूचनेनुसार, सोमवारी सकाळच्या सत्रातील पाणीपुरवठा नियमितपणे करण्यात येईल. मात्र, पाईपलाईनच्या कामामुळे दुपार व संध्याकाळच्या सत्रातील पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा सकाळीच करून ठेवावा. दरम्यान, गोवळकोट गाव, गोवळकोट रोड, पेठमाप आणि उक्ताड या भागांना याला अपवाद ठेवण्यात आले असून या परिसरात सकाळी व संध्याकाळी अशा दोन्ही सत्रांत पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाला सहकार्य करावे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन मुख्याधिकारी संजय जाधव यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.